Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | News | Australia vs Pakistan Quarter Final match live scores

WC : उपांत्य फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच, पाकला सहज नमवले

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Mar 20, 2015, 04:28 PM IST

या सामन्यात जिंकणाऱ्या संघाची उपांत्य फेरीत भारताबरोबर गाठ पडणार आहे. त्यामुळे जगभराबरोबरच भारतीय चाहत्यांच्याही या सामन्यावर नजरा आहेत.

 • Australia vs Pakistan Quarter Final match live scores
  Paragraph Filter
  अॅडिलेड - पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलेल्या 214 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 गडी आणि 16 षटकं राखून पूर्ण केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ आणि वॉटसनने अर्धशतके करत विजयी कामगिरी सोपी केली. त्यानंतर उरले सुरले काम मॅक्सवेलने पूर्ण केले.
  फोटो - एक फटका लगावताना स्मिथ.
  ऑस्ट्रेलिया पाकिस्तानने दिलेले आव्हान सहज पूर्ण करणार असे वाटत असतानाच पाकिस्तानच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. सुरुवातीलाच फिंचला बाद करत आपले इरादे स्पष्ट केले. त्यापाठोपाठ वाहब रियाझने वॉर्नर आणि क्लार्कला बाद करत ऑस्ट्रेलियाला दोन धक्के दिले. त्यानंतर आलेल्या वॉटसनलाही रियाझने चांगलेच बांधून ठेवले होते. पण वॉटसनने शांतपणे त्याची षटके खेळून काढली आणि मैदानावर जमही बसवला.
  विश्वचषकातील तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात जिंकणाऱ्या संघाची उपांत्य फेरीत भारताबरोबर गाठ पडणार आहे. त्यामुळे जगभराबरोबरच भारतीय चाहत्यांच्याही या सामन्यावर नजरा आहेत.
  प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेले पाकिस्तानचे सलामीवीर अहमद शेहजाद आणि सरफराज अहमद सुरुवातीला चांगली फलंदाजी करत होते. अगदी चांगल्या प्रकारे ऑस्ट्रेलियाचा सुरुवातीचा वेगवान गोलंदाजीचा मारा खेळून काढायचा प्रयत्न त्यांनी केला. पण स्टार्क आणि हेजलवूजड यांच्या स्विंगसमोर त्यांना बचाव करता आला नाही. दोघेही स्लिपमध्ये झेलबाद झाले.
  कर्णधार मिसबाह उल हक आणि हारीस सोहेल यांनी चांगली फलंदाजी करत पाकिस्तानचा डाव सावरला. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. पण दोघे फलंदाज सेट झालेले असतानाच मॅक्सवेलच्या एका चेंडूवर मिसबाहने चुकीचा फटका मारला आणि फिंचच्या हाती झेलबाद झाला. त्यामुळे पाकिस्तानला तिसरा धक्का बसला. त्यापाठोपाठ मिशेल जॉन्सनच्या गोलंदाजीवर हारीस सोहेर विकेटकिपर हॅडीनच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतरमॅक्सवेलने उमर अकमलला बाद केले यावेळीही झेल घेतला तो फिंचनेच. त्यानंतर आफ्रिदीने काही फटके खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही फार वेळ मैदानावर टिकता आले नाही. त्याला हेजलवूडने 23 धावांवर बाद केले.
  पाकिस्तान स्कोअर बोर्ड
  फलंदाज विकेट धावा चेंडू 4 6
  अहमद शहजाद झेल क्लार्क गो. हेजलवूड 5 13 0 0
  सरफराज अहमद झेल वाटसन गो. स्टार्क 10 16 1 0
  हारिस सोहेल झेल हॅडिन गो. जॉन्सन 41 57 4 0
  मिसबाह उल हक झेल फिंच गो. मॅक्सवेल 34 59 1 2
  उमर अकमल झेल फिंच गो. मॅक्सवेल 20 25 2 0
  शोएब मकसूद झेल जॉन्सन गो. हेजलवूड 29 44 1 0
  शाहीद आफ्रिदी झेल फिंच गो. हेजलवूड 23 15 3 1
  वाहब रियाझ झेल हॅडीन गो. स्टार्क 16 22 2 0
  एहसान आदिल झेल स्टार्क गो. फॉकनर 15 22 1 0
  सोहेल खान झेल हॅडीन गो. हेजलवूड 4 5 0 0
  राहत अली नाबाद 6 21 0 0

  > यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत दोन्ही संघांची कामगिरी
  > ऑस्ट्रेलिया : 4 सामने जिंकले, 01 पराभव, 01 रद्द
  - इंग्लंला 111 धावांनी पराभूत केले.
  - बांग्लादेश विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द (1-1 गुण मिळाला)
  - न्यूझीलंडबरोबरचा सामना हारला, किवी एका विकेटने जिंकले
  - अफगाणिस्तानच्या विरोधातील सामना 275 धावांनी जिंकला.
  - श्रीलंकेच्या विरोधातील सामना 64 धावांनी जिंकला.
  - स्कॉटलंडबरोबरचा सामना 7 विकेटने जिंकला.

  > पाकिस्तान : 4 सामने जिंकले, 2 पराभव
  - भारता विरुद्धच्या सामन्यात 76 धावांनी पराभव.
  - वेस्ट इंडिज विरोधातील सामना 150 धावांनी गमावला.
  - झिम्बाब्वे विरोधातील सामना 20 धावांनी जिंकला.
  - युएईच्या विरोधातील सामना 129 धावांनी जिंकला.
  - साऊथ आफ्रिकेबरोबरचा सामना 29 धावांनी जिंकला.
  - आयर्लंडविरोधातील सामना 7 विकेटने गमावला.
  पुढील स्लाइड्सवर पाहा, सामन्याचे PHOTO

 • Australia vs Pakistan Quarter Final match live scores
  पाकिस्तानचा गोलंदाज वहाब रियाझ.
 • Australia vs Pakistan Quarter Final match live scores
  वॉटसनने अर्धशतकी खेळी केली.
 • Australia vs Pakistan Quarter Final match live scores
  स्मिथने अर्धशतक करत डाव सावरला.
 • Australia vs Pakistan Quarter Final match live scores
  फिंचला बाद केल्यानंतर आनंद साजरा करताना सोहेल.
 • Australia vs Pakistan Quarter Final match live scores
  विकेट मिळाल्यानंतर पाकिस्तानचा संघ.
 • Australia vs Pakistan Quarter Final match live scores
  दुसरी विकेट मिळाल्यानंतर मॅक्सवेलने असा आनंद साजरा केला.
 • Australia vs Pakistan Quarter Final match live scores
  एक फटका लगावताना मिसबाह उल हक.
 • Australia vs Pakistan Quarter Final match live scores
  विकेट मिळाल्यानंतर ब्रॅड हॅडीन आणि मायकल क्लार्क.
 • Australia vs Pakistan Quarter Final match live scores
  शहजाद बाद झाल्यानंतर आनंद साजरा करताना ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू.
 • Australia vs Pakistan Quarter Final match live scores
  सरफराजचा फटका अडवताना विकेटकिपर ब्रॅड हॅडीन.
 • Australia vs Pakistan Quarter Final match live scores
  सरफराजबाबत काहीतरी कमेंट करताना मिशेल स्टार्क.
   
 • Australia vs Pakistan Quarter Final match live scores
  राष्ट्रगीताच्या वेळी दोन्ही संघ.

Trending