आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पशा यशाने भरकटणारी मी नाही : पी. सिंधू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाेपाळ - अल्पशा यशामुळे मी भरकटणारी नाही. रिअाे अाॅलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर पॅरिस अाणि डेन्मार्क अाेपनमधील पराभव हा खेळातील एक भाग अाहे. रिअाेतील यशानंतरही माझे पाय जमिनीवरच अाहेत. या पदकाचा मला कुठल्याही प्रकारचा गर्व नाही, अशा शब्दांत अाॅलिम्पिक राैप्यपदक विजेत्या बॅडमिंटनपटू सिंधूने अापले परखड मत व्यक्त केले. या चांदीच्या पदकाला अाता लवकरच सुवर्णपदकात बदलण्याचा विश्वासही तिने व्यक्त केला.

भाेपाळ येथे अायाेजित पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये सिंधूने सहभाग घेतला हाेता. याप्रसंगी तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तिच्या उपस्थितीत साेहळ्यात पुरस्काराचे वितरण करण्यात अाले. या साेहळ्यादरम्यान मध्य प्रदेश राज्य बॅडमिंटन महासंघाच्या वतीने सिंधूचा ५० लाख अाणि स्मृतिचिन्ह देऊन गाैरव करण्यात अाला.

पीबीएलच्या लिलावामध्ये सिंधूला मरिन अाणि सायनापेक्षाही कमी किंमत मिळाली अाहे. याविषयी ती म्हणाली की, अामचे लक्ष्य हे चांगली कामगिरीवर करण्यावर केंद्रित झालेले असते. त्यामुळे किमतीचा अाकडा अाम्ही कधीही पाहत नाही. क्षमतेनुसारच खेळाडूवर बाेली लावण्यात अाली अाहे. सायना अाणि मरिन या दाेघी प्रतिभावंत खेळाडू अाहेत. मरिन ही स्टार खेळाडू अाहे. तिने अाॅलिम्पिकच्या फायनलमध्ये चुरशीची झुंज दिली हाेती.

अाॅलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर अाता तेलंगणा अाणि अांध्र प्रदेश या दाेन्ही राज्यांनी सिंधू अापली खेळाडू असल्याचे सांगत श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला, या प्रश्नावरही तिने दाेनच शब्दांत उत्तर देऊन वादावर पडदा टाकला. मी केवळ भारत देशाची मुलगी अाहे, अशा शब्दांत तिने उत्तर दिले. पदक जिंकण्यापूर्वी अाणि नंतरच्या सिंधूमध्ये काेणत्याही प्रकारचा फरक पडलेला नाही. कारण यश हे क्षणिक असते. या पदकाला खेळाडू हे अापापल्या परीने गवसणी घालत असतात. त्यामुळे यावर काेणाचेही दीर्घ काळ वर्चस्व राहत नाही. त्यामुळे रिअाेतील पदकानंतर माझे पाय हे जमिनीवरच अाहे, असेही सिंधू म्हणाली. अाता अागामी स्पर्धेच्या तयारीसाठी तिने सरावला सुरुवात केली अाहे. तिला पीबीएलमध्ये सरस कामगिरीची अाशा अाहे.
बातम्या आणखी आहेत...