आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandila Gets Life Ban And Hiken Shah For 5 Years From BCCI

IPL स्पॉट फिक्सिंग : अजित चंदिलावर BCCI ने घातली आजीवन बंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजित चंदिला (फाइल फोटो) - Divya Marathi
अजित चंदिला (फाइल फोटो)
मुंबई - IPL स्पॉट फिक्सिंगप्रकरणातील आरोपी क्रिकेटपटू अजित चंदीलावर कायमस्वरुपी बंदी लादण्यात आली आहे. तसेच हिकेन शाहवर 5 वर्षे बॅन करण्यात आला आहे. बीसीसीआयने सोमवारी मिटींगनंतर हा निर्णय घेतला. चंदिला आणि शाह यांनी 24 डिसेंबर 2015 रोजी 3 मेंबर्सच्या कमिटीच्या प्रश्नांची उत्तरे विचारली होती. चंदिलाला 2013 मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक केली होती. श्रीसंत आणि अंकित चव्हाणवर बीसीसीआय नंतर सुनावणी करेल.

BCCI चा निर्णय
- अजित चंदिलाला भ्रष्टाचार आणि गैरवर्तन प्रकरणी दोषी सिद्ध ठरवण्यात आले आहे. त्याच्यावर बीसीसीआयच्या करप्शन कोड अंतर्गत आजीवन बंदी लावण्यात आली आहे. तो क्रिकेटच्या कोणत्याही स्पर्धेत कोणत्याच माध्यमातून सहभागी होऊ शकणार नाही.
- हिकेन शाहला बीसीसीआयच्या अँटी करप्शन कोड अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. त्याच्यावर पाच वर्षांची बंदी लावण्यात आली आहे. त्यादरम्यान तो क्रिकेटबरोबर संबध ठेवू शकणार नाही.

असद रऊफची मागणी अमान्य
- पाकिस्तानचा माजी अंपायर असद रऊफ सुनावणीसाठी गैरहजर राहिले. पण त्यांनी उत्तर पाठवले होते. तपास प्रक्रियेवर समाधानी नसल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा चौकशीची मागणी केली होती.
- डिसिप्लीनरी कमेटीने त्यांची मागणी अमान्य करत त्यांना लेखी निवेदन सादर करण्याची अखेरची संधी दिली आहे.
- त्यांनी 9 फेब्रुवारी 2016 पर्यंत सर्व डॉक्युमेंट्स जमा करावे लागतील. पुढील सुनावणी 12 फेब्रुवारीला होईल.
- रऊफ यांनी आपण निर्दोष असल्याचे सांगितले आणि त्यानंतर ते पुन्हा कधीही भारतात आले नाही.

कोर्टाकडून सुटका बीसीसीआयचा बॅन
- आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या चंदिला, श्रीसंत आणि अंकित चव्हाण ला स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक केले होते.
- श्रीसंत आणि अंकित दोघांवर भारतीय क्रिकेट बोर्डाने बॅन लावला होता. पण दिल्लीच्या एका न्यायालयाने दोघांची सुटका केली होती.
- चंदिलारवरही बंदी लावण्यात आली होती. पण बोर्डाने अंतिम निर्णय घेतला नव्हता.
संपूर्ण प्रकरण
- IPL च्या 6 व्या पर्वात दिल्ली पोलिसांनी मुंबईहून श्रीसंतसह राजस्थान रॉयल्सच्या तिघांना अटक केली होती.
- पोलिसांच्या मते 2013 मध्ये मुंबई, जयपूर आणि मोहालीतील सामन्यात तील सामन्यात स्पॉट फिक्सिंग झाले होते.