आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रमवारी: स्मिथचे करिअरमध्ये सर्वोत्तम 939 गुण; कोहली, पुजाराचे नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - पुण्यात झालेल्या भारत-अॉस्ट्रेलिया कसोटीनंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. पुण्यात ऑस्ट्रेलियाने भारताला हरवले. याचा परिणाम क्रमवारीत दिसला. पुण्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने दुसऱ्या डावात शतक ठोकले होते. आता तो करिअरमधील बेस्ट ९३९ रँकिंग गुणांवर पोहोचला आहे. ऑल टाइम रँकिंग गुणांत त्याच्यापेक्षा पुढे आता सर डॉन ब्रॅडमन (९६१), सर लेन हटन (९४५), जॅक हॉब्ज आणि रिकी पाँटिंग (दोघे ९४२) हे आहेत.
 
भारतीय कर्णधार विराट कोहली स्मिथनंतर दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. मात्र, पुणे कसोटीत अपयशी ठरल्यानंतर त्याचे २२ गुणांचे नुकसान झाले. चेतेश्वर पुजारासुद्धा पुण्यात खास कामगिरी करू शकला नाही. परिणामी, तो क्रमवारीतून टॉप-१० बाहेर झाला आहे. त्याच्या जागी ए. बी. डिव्हिलर्स पुन्हा टॉप-१० मध्ये आला आहे.  गोलंदाजांत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह ओकिफेला ३३ स्थानांचा फायदा झाला असून, तो आता थेट २९ व्या स्थानी पोहोचला आहे. 
 
ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा फायदा : टॉप-१० बाहेर ऑस्ट्रेलियाचा मॅट रेनशॉ १८ स्थानांच्या प्रगतीसह ३४ व्या, मिशेल स्टार्क २७ स्थानांच्या जबरदस्त झेपेसह ६१ व्या आणि मिशेल मार्श तीन स्थानांच्या फायद्यासह ९४ व्या स्थानी पोहोचले आहेत. उस्मान ख्वाजा १२ व्या आणि पीटर हँड्सकोंब ४० व्या स्थानी आहेत.  
 
भारतीयांची घसरण 
फलंदाजांत अजिंक्य रहाणे १७ व्या स्थानी घसरला आहे. मुरली विजयचे ४ स्थानांचे नुकसान झाले असून तो आता ३० व्या स्थानी आहे. लोकेश राहुलने पुण्यात अर्धशतक ठोकले. त्याला ११ स्थानांचा फायदा झाला. राहुल आता टॉप-५० मध्ये आला असून तो ४६ व्या क्रमांकावर आहे. रवींद्र जडेजा १० स्थानांच्या नुकसानीसह ६५ व्या क्रमांकावर घसरला. टॉप-५० मध्ये आर. अश्विन असून तो ४९ व्या स्थानी आहे. 

टॉप-५ फलंदाज असे
१. स्टीव्हन स्मिथ, ऑस्ट्रेलिया    ९३९  
२. विराट कोहली, भारत    ८७३  
३. जो. रुट, इंग्लंड    ८४८  
४. केन विल्यम्सन, न्यूझीलंड    ८२३  
५. डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलिया    ८०५  

टॉप-५ गोलंदाज असे
१. रविचंद्रन अश्विन, भारत    ८७८  
२. रवींद्र जडेजा, भारत    ८६०  
३. जोश हेझलवूड, ऑस्ट्रेलिया    ८६०  
४. रंगना हेराथ, श्रीलंका    ८२७  
५. कॅगिसो रबाडा, द. आफ्रिका    ८२१

मालिका संपली नाही...
एका पराभवाने खचण्याचे कारण नाही. मालिका अजून संपलेली नाही. ऑस्ट्रेलिया मजबूत टीम आहे. मात्र, भारतीय संघ पुढच्या सामन्यांत जबरदस्त प्रदर्शन करून पुनरागमन करेल, याचा मला विश्वास आहे - सचिन तेंडुलकर, माजी खेळाडू.
 
बातम्या आणखी आहेत...