आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैदानावर दिसली मुशाफिकूरची \'गुस्ताखी\', पण धोनीच्याच मानधनात 75% कपात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांगलादेश आणि भारतीय संघांमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धोनी आणि मुशाफिकूर यांच्यात चांगलाच संघर्ष दिसून आला. बांगलादेशाच्या गोलंदाजांनी भारतीय टीमच्या खेळात वारंवार व्यत्यय आणले. त्यामुळे रन काढत असताना धोनीने मुशाफिकूरला जोरदार धक्का दिला. 24 व्या ओव्हरच्या वेळी ही घटना घडली. यावेळी मुशाफिकूर बॉलिंग करीत होता. या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर शॉट मारुन रन घेण्यासाठी धोनी धावला. मुशाफिकूर मुद्दाम धोनीच्या मार्गात आला. त्यावर धोनी भडकला. त्याने मुशाफिकूरला जोरदार धक्का देऊन रन पूर्ण केला. दरम्यान, धोनीच्या या वर्तनामुळे मानधनात 75 टक्के कपात करण्यात आली असून मुशाफिकूरचे मानधन 50 टक्के कापण्यात आले आहे.
कॅप्टन कुल धोनीने असे का केले?
मुशाफिकूरने या एकदिवसीय सामन्यातून डेब्यु केले. त्याच्या बॉलिंगवर शॉट मारुन भारतीय फलंदाज जेव्हा धावा काढायचे तो मुद्दाम मध्ये यायचा. त्यामुळे रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैनाला समस्यांचा सामना करावा लागला. एकदा तर रोहित प्रचंड चिडला होता. एम्पायरनेही मुशाफिकूरला याबाबत टोकले होते. तरीही तो मानायला तयार नव्हता. परंतु, त्याने जेव्हा हीच गोष्ट धोनीसमोर केली तेव्हा त्याचा संताप अनावर झाला. धोनीने त्याला चांगलाच धडा शिकवला.
स्लॅजिंग करताना दिसले बांगलादेशी
भारतीय फलंदाज बॅटिंग करीत होते तेव्हा गली, पॉईंट आणि स्लिपमधील बांगलादेशी खेळाडू आक्षेपार्ह बोलून खेळात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत होते. फलंदाजाचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करीत होते. धोनी आऊट झाल्यावर काही खेळाडूंनी तर अपशब्द वापरल्याचेही समजते.
बांगलादेशचा रेकॉर्ड परफॉर्मन्स
पहिल्याच एकदिवसीय सामन्यात बांगलादेशाने टीम इंडियाला तब्बल 79 धावांनी हरवले. भारताविरुद्ध खेळताना बांगलादेशने पहिल्यांदाच 300 च्या जादुई आकड्याला स्पर्श केला. बांगलादेशने पहिल्यांदाच तीसऱ्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला. यापूर्वी बांगलादेशाने वेस्ट इंडिजला 160 धावांनी तर पाकिस्तानला 79 धावांनी हरवले होते. बांगलादेशने पहिले बॅटिंग करताना 49.4 ओव्हरमध्ये 307 रन केले. त्याला उत्तर देताना टीम इंडियाचे फलंदाज 228 धावांवरच ढेपाळले.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, टीम इंडियाच्या पराभवाची प्रमुख कारणे... यामुळे हरली टीम इंडिया...