आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेचसाठी गांगुली, द्रविडचे नाव चर्चेत!, फ्लेचरच्या जागी कोण येणार ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकपदासाठी बंगाल टायगर अाणि माजी कर्णधार साैरव गांगुली, राहुल द्रविडच्या नावाची चर्चा केली जात अाहे. मात्र, ही अफवा असल्याचे गांगुलीने स्पष्ट केले. तसेच द्रविडने यावर काेणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

अापल्याला क्रिकेटच्या प्रशासनात अावड असल्याची स्पष्टाेक्ती गांगुलीने केल्याची माहिती सूत्रांनी दिली. डंकन फ्लेचर यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ भारतीय संघाच्या विश्वचषकातील पराभवासह संपुष्टात अाला. सध्या टीमसाठी हाय प्राेफाइल काेचचा शाेध युद्धपातळीवर सुरू अाहे. या मुद्द्यावर विविध सल्लेदेखील मिळत अाहेत. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठीची चर्चा सुरू अाहे. टीमच्या अांतरराष्ट्रीय कार्यक्रमाला जूनमध्ये सुरुवात हाेणार अाहे. बीसीसीअायकडे प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी अद्याप भरपूर वेळ अाहे,’ अशी माहिती मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली. गुरुवारी साैरव गांगुलीने बीसीसीअाय अध्यक्ष दालमिया यांची भेट घेतली.
त्यामुळे गांगुली प्रशिक्षकपदासाठी उत्सुक असल्याच्या चर्चेला उधाण अाले. येत्या २६ एप्रिल राेजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची महत्त्वाची बैठक हाेणार अाहे. या बैठकीपूर्वी गांगुलीने ही भेट घेतली अाहे.