आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावसकरांकडून विराटचे कौतूक, म्हणाले, अर्ध्या रात्रीही अंधारात करेल हा बॅटिंग!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुस-या टी-20 सामन्यात फटका मारताना विराट कोहली - Divya Marathi
दुस-या टी-20 सामन्यात फटका मारताना विराट कोहली
मेलबर्न- ऑस्ट्रेलियात जबरदस्त कामगिरी करीत असलेल्या विराट कोहलीचे माजी कसोटीपट्टू सुनील गावसकर यांनी तोंड भरून कौतूक केले आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरूद्ध दुस-या टी-20 सामन्यात कोहलीने नाबाद अर्धशतक (59) ठोकले. या खेळीने प्रभावित झालेल्या विश्वविक्रमवीर सुनील गावसकर यांनी विराट अर्ध्या रात्री अंधारातही लाईटशिवाय बॅटिंग करेल व धावा गोळा करेल अशी स्तुतीसुमने उधळली.
गावसकर यांनी विराटबाबत काय म्हटले...

- एनडीटीव्हीशी बातचीत करताना गावसकर म्हणाले, '' विराट जबरदस्त कामगिरी करीत आहे. तो सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. भविष्यातही तो अशीच यशाची शिखरे पादाक्रांत केल्याशिवाय राहणार नाही. अशी कामगिरी करण्याचा प्रत्येक खेळाडू प्रयत्न करतो, स्वप्न पाहतो. विराट तो सत्यात उतरवत आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू त्याला बाद करू शकले नाहीत. विरोधी टीम वाट पाहत बसते की कधी हा एखादी चूक करतो.
- गावसकरांना विचारले की, तुम्ही कोणाला गोलंदाजी करणे पसंत कराल, विराट की रोहित? यावर ते म्हणाले, दोघांनाही नाही, कारण खूप मार पडेल.
- ते पुढे म्हणाले की, रोहित मला पकडून पकडून मारेल तर कोहली माझा पंच करून मारून टाकेल. कोठेही गेलो तरी मरावे लागेल त्यापेक्षा त्यांना चेंडू न टाकणेच योग्य होईल.
भारतीय संघाला दिला सल्ला?
- गावसकरने टीम इंडियाला सल्ला देताना म्हटले आहे की, भारताने भलेही मालिका जिंकली असेल पण फलंदाजी क्रमांत बदल करू नये. -
- गावसकरांना विचारले की, काय युवराज सिंगला वरच्या क्रमांकावर फलंदाजी करायला पाठवावे का?
- यावर गावसकर म्हणाले, मला वाटते भारताने ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली पाहिजे. कोहलीने तिस-या क्रमांकावरच यायला पाहिजे. जबरदस्त कामगिरी होत असताना उगीच छेडछाड करण्यात हित नसते.
- युवराजला आशिया चषक, वर्ल्ड कप टी-20 मध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळेल. भारताने आता ऑसट्रेलियाला क्लीन स्वीप दिला पाहिजे.
ऑस्ट्रेलिया दौ-यातील विराटची कामगिरी-
- 27 वर्षाच्या विराटने सलग दोन टी-20 सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळवला आहे.
- विराट कोहली असा खेळाडू बनला आहे ज्याचे टी-20 सामन्यात 50 पेक्षा जास्त धावांची सरासरी आहे.
धावा- एकदिवसीय मालिका
पहिला सामना : 91 धावा
दूसरा सामना : 59 धावा
तिसरा सामना : 117 धावा
चौथा सामना: 106 धावा
पाचवा सामना : 8 धावा
टी-20 मालिका

पहिला सामना : नाबाद 90
दूसरा सामना : नाबाद 59
दोन सराव सामने

पहिला सामना: 74 धावा
दूसरा सामना : 7 धावा
एकून 611 धावा, सरासरी- 87.29
पुढे पाहा, विराट क्षेत्ररक्षणातही आहे पुढे...