आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Vs Australia Semi final On Thursday, Mitchell Johnson Wants To Be Sledger in Chief News In Marathi

भारत-अाॅस्ट्रेलिया सेमीफायनल उद्या; माझा ‘स्लेजर इन चीफ’चा रोल : जॉन्सन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- भारताविरुद्ध सेमीफायनलमध्ये स्लेजर इन चीफची भूमिका करण्याचा मी विचार करतोय, असे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने म्हटले. वार्नर अशा प्रकारच्या गोष्टीत सहभागी होऊ इच्छित नाही. मात्र, कोणाला तरी हे करावेच लागेल. मी या गोष्टीसाठी स्वत:ला तयार करत अाहे, असे जॉन्सन म्हणाला.
येत्या २६ मार्च राेजी भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना हाेणार अाहे. अाॅस्ट्रेलियाचा जाॅन्सन हा प्रतिस्पर्धी खेळाडूंसाेबतच्या गैरवर्तनासाठी बदनाम अाहे.

कांगारूंना हरवण्याची चांगली संधी : काेहली
सातत्याने अाम्ही चांगली कामगिरी करत अाहाेत. गाेलंदाजीचे अाम्हाला पूर्ण सहकार्य मिळत अाहे. अाॅस्ट्रेलियाचे अाव्हान संपुष्टात अाणण्याची हीच याेग्य संधी अाहे, असे मत विराट काेहलीने व्यक्त केले. ‘खेळाडू चांगले याेगदान देत अाहेत. टीममध्ये अात्मविश्वास ठासून भरला अाहे,’ असेही ताे म्हणाला. येथील स्टेडियममध्ये सेमीफायनल पाहण्यासाठी जमलेल्या तमाम भारतीय चाहत्यांचादेखील अाम्हाला माेठा पाठिंबा मिळेल. संघातील खेळाडूंसाठी ही माेठी ऊर्जाच असेल, असेही ताे म्हणाला.

भारत हरवू शकते : डॅरेन
येत्या गुरुवारी सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी ) भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात धावांचा पाऊस पडेल, अशी अाशा यजमान अाॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी व्यक्त केली. ‘श्रीलंकेविरुद्ध झालेल्या साखळी सामन्यासारखीच या मैदानावरची खेळपट्टी अाहे, असे मला वाटते.

आता जबाबदारी माझी : फिंच
ऑस्ट्रेलियाचा अॅरोन फिंचने भारताविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तो फाॅर्म सुधारण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू अँड्यू मॅक्डोनाल्डसोबत कठोर मेहनत करत आहे. आता माझी वेळ आली आहे. मी टीम इंडियाविरुद्ध अवश्य धावा करेल, असे फिंचने म्हटले.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, रवींद्र जडेजाचा नवा लूक...