आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलदीप यादवच्या चाैकाराने श्रीलंकेचा धुव्वा; टीम इंडियाला विजयाची संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पल्लेकल - युवा खेळाडू हार्दिकच्या (१०८) स्फाेटक फलंदाजीनंतर कुलदीप यादवने (४/४०) केलेल्या धारदार गाेलंदाजीमुळे टीम इंडियाचा विजयाचा यजमान श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या कसाेटीतील शानदार विजयाचा मार्ग सुकर झाला अाहे.
 
पहिल्या डावात ४८७ धावा काढणाऱ्या भारताने रविवारी दुसऱ्या दिवशी यजमानांना पहिल्या डावात अवघ्या १३५ धावांमध्ये गुंडाळले. त्यानंतर फाॅलाेअाॅनची नामुष्की अाेढवलेल्या श्रीलंकेने दुसऱ्या डावात दिवसअखेर १ बाद १९ धावा काढल्या. या डावाने पराभव टाळण्यासाठी यजमानांना ३३३ धावांचे खडतर लक्ष्य गाठावे लागणार अाहे. दुसरीकडे पहिल्या डावात धारदार गाेलंदाजी करणाऱ्या भारताच्या युवा खेळाडूंची नजर अाता दुसऱ्या डावात श्रीलंकेला झटपट गुंडाळण्याकडे लागली अाहे. यातून भारतीय संघाला सामन्यात झटपट विजयासह अल्पावधीत विक्रमाचा पल्ला गाठण्याची संधी अाहे. भारताने रविवारी  ६ बाद ३२९ धावांवरून दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राला सुरुवात केली.   

१८९६ नंतर हार्दिक भारताचा पहिला फलंदाज
हार्दिकने तुफानी फटकेबाजीच्या बळावर सकाळचे सत्र गाजवले. त्याने लंचपर्यंत यशस्वीपणे शतकाचा पल्ला गाठला. यातून त्याच्या नावे नव्या कामगिरीची नाेंद झाली. लंचपूर्वी १०० वा त्यापेक्षा अधिक धावा काढणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याने १०८ धावांची खेळी केली. यापूर्वी १८९६ मध्ये रणजित सिंग (इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना) यांनी ही कामगिरी नाेंदवली हाेती. त्यानंतर अाता हे यश हार्दिकने मिळवले. अातापर्यंत जगभरातील पाच फलंदाजांनी हे यश मिळवले अाहे.

कुलदीप यादवने पहिल्या डावात घेतल्या ४ विकेट
भारताचा युवा गाेलंदाज कुलदीप यादव दुसऱ्या दिवशी चमकला. त्याने धारदार गाेलंदाजी करताना लंकेच्या चार अव्वल फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने डिकवेला (२९), परेरा (०), पुष्पकुमारा (१०) अाणि फर्नांडाे (०) यांना झटपट बाद केले. तसेच अार.अश्विन अाणि माे. शमीने प्रत्येकी दाेन गडी बाद केले. त्यामुळे यजमान श्रीलंकेला अापला पहिला डाव झटपट गुंडाळावा लागला.

११६ व्या षटकात २ चाैकार, ३ षटकार
हार्दिकने मलिंडा पुष्पकुमाराच्या एका षटकात सर्वाधिक २६ धावा काढल्या. हे भारताच्या डावातील ११६ वे षटक ठरले. त्याने २ चाैकार व पुढच्या ३ चेंडूंवर ३ षटकार ठाेकले.यासह ताे पहिला भारतीय  फलंदाज ठरला. त्याने कपिलदेव अाणि संदीप पाटीलला (प्रत्येकी २४ धावा) मागे टाकले.

विदेशात सर्वात वेगवान भारतीय शतक
भारताच्या हार्दिकने विदेशी खेळीपट्टीवर सर्वात वेगवान कसाेटी शतकाची नाेंद केली. त्याने श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात ८६ चेंडूंचा सामना करताना शतक पूर्ण केले. यापूर्वी २००६ मध्ये सेहवागने विंडीजविरुद्ध ७८ चेंडूंत शतक ठाेकले हाेते.

संदीप पाटील यांचे षटकात सहा चाैकार
भारताचे माजी खेळाडू संदीप पाटील यांच्या नावे एकाच षटकात सहा चाैकार मारण्याची नोंद अाहे. त्यांनी १९८२ मध्ये इंग्लंडविरुद्ध सामन्यात विलीसच्या षटकात हा पराक्रम गाजवला.
 
पुढील स्‍लाइडवर...धावफलक
बातम्या आणखी आहेत...