आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा करार; आता सोनीवर नव्हे, तर स्टारवर दिसतील IPL सामने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- स्टार इंडियाने आयपीएलचे ५ वर्षांचे मीडिया राइट्स १६३४७.५ कोटींत (२.५ अब्ज डॉलर) खरेदी केले. यात २०१८ पासून २०२२ आयपीएलच्या जागतिक टीव्ही व डिजिटल हक्कांचा समावेश आहे. २००८ मध्ये आयपीएल हक्क १० वर्षांसाठी ८२०० कोटींत विकले होते. माध्यम हक्कापासून बोर्डाची कमाई १० वर्षांत २९९% वाढली आहे. प्रसारण हक्कासाठी २४ कंपन्या मैदानात होत्या.  बोली फक्त १४ कंपन्यांनीच लावली. मीडिया राइट्ससाठी ७ श्रेणी ठरवल्या होत्या. मात्र स्टारने एकरकमी बोली लावून सर्वच हक्क ताब्यात घेतले.

स्टार स्पाेर्ट््सचे सर्व चॅनलचे रिचार्ज दर वाढू शकतात
आयपीएलवर इतकी मोठी रक्कम लावल्यानंतर स्टार इंडिया विविध डीटीएच व केबल प्लॅटफॉर्मवर आपल्या स्पोर्ट््स पॅकेजचे दर वाढवू शकतो.  तथापि, याबाबतीत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.

1993 मध्ये पहिल्यांदा बोर्डाने विकले होते मीडिया राइट्स
1992: दूरदर्शनने भारतात होणाऱ्या सामन्यांच्या प्रसारणासाठी बीसीसीआयकडे ५ लाख रुपयांची मागणी केली होती.
1993: बीसीसीआयने भारत-इंग्लंड मालिका प्रसारणाचे हक्क प्रथमच ६ लाख डॉलरला विकले होते.
2000: दूरदर्शनने बोर्डाकडे भारतात होणाऱ्या सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क ३ वर्षांसाठी २४० कोटींत विकत घेतले.
2006: निंबसने चार वर्षांसाठी प्रसारण हक्क सुमारे २ हजार ६९२ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. 
2008: सोनी व डब्ल्यूएसजीने आयपीएल हक्क १० वर्षांसाठी ८,२०० कोटी रुपयांत खरेदी केले.
2017: स्टारने आयपीएल अधिकार ५ वर्षांसाठी १६,३४७ कोटी रुपयांत विकत घेतले.
 
हे होते स्पर्धक
मीडिया राइट्स मिळवण्यासाठी रिलायंस जिओ, स्टार इंडिया, फेसबूक, ट्विटर, अॅमेझॉन अशा एकूण 24 देशी-परदेशी कंपन्यांनी लिलावात सहभाग घेतला होता. 2018 ते 2022 पर्यंत हा करार लागू राहणार आहे. यापूर्वी IPL प्रसारणाचे अधिकार SONY कडे होते. यावेळी सोनीने 11,050 कोटी रुपयांची बोली सुद्धा लावली. मात्र, केवळ भारतातील टीव्ही प्रसारणासाठीच. या व्यतीरिक्त 84.5 कोटी रुपयांची बोली त्यांनी आणखी एका कॅटेगरीसाठी लावली होती. तर, दुसरीकडे स्टार इंडियाने सर्वच कॅटेगरीजमध्ये बोली लावून बाजी मारली आहे. 
 
यापूर्वी असा होता करार
- IPL प्रसारणाचे मीडिया राइट्स आतापर्यंत सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाकडे होते. तर, स्टार इंडियाकडे लीगचे डिजीटल राइट्स होते. दोन्ही कंपन्यांचा करार 2017 मध्ये संपुष्टात आला. 
- 2008 मध्ये सोनी पिक्चर्स नेटवर्कने 10 वर्षांसाठी 8200 कोटी रुपये देऊन राइट्स मिळवले होते. तर, 2015 मध्ये नोवी डिजिटलला तीन वर्षांसाठी ग्लोबल डिजीटल अधिकार 302.2 कोटी रुपयांत विकण्यात आले होते.
 
लिलावात होत्या 7 कॅटेगरीज
- बीसीसीआयने पूर्वी 3 विभागात लिलाव केले. त्यामध्ये भारतात टीव्ही प्रसारणाचे राइट्स, भारतात डिजीटल प्रसारणाचे राइट्स आणि उर्वरीत जगभरात टीव्ही आणि डिजीटल मीडिया राइट्स इत्यादींचा समावेश होता.
- यावेळी 7 कॅटेगरीजमध्ये लिलाव करण्यात आला आहे. भारतात टीव्ही राइट्स आणि भारतात डिजीटल राइट्सची कॅटेगरी तशीच आहे. या व्यतीरिक्त अमेरिका, यूरोप, मध्यपूर्व, अफ्रीका आणि इतर देशांमध्ये प्रसारणाचे अधिकार असे विभाजन करण्यात आले आहे. या 5 भागांमध्ये टीव्ही आणि डिजीटल मीडिया राइट्स असे विभाग आहेत.
 
 
स्टार इंडियाने अशी लावली बिड
कॅटेगिरी बिड अमाउंट (कोटींमध्ये)
भारत (उपखंड) टीव्ही राइट्स 6196.94
भारत (उपखंड) डिजीटल राइट्स 1443.00
रो-ए 17.88
रो-बी 65.00
रो-सी 61.75
रो-डी 48.75
रो-ई 49.16
 
बातम्या आणखी आहेत...