आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : राजस्थानचा सलग दुसरा विजय, दिल्ली डेअरडेव्हिल्सला 3 विकेटने हरवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दीपक हुड्डाचे (५४) शानदार अर्धशतक आणि अखेरच्या चेंडूवर टीम साउथीने मारलेल्या शानदार चौकाराच्या बळावर राजस्थान रॉयल्सने रविवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सला ३ विकेटने हरवले. हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रोमांचक ठरला. डेअरडेव्हिल्सने १८४ धावांचा मजबूत स्कोअर उभा केला. मात्र, राजस्थानने ७ गड्यांच्या मोबदल्यात १८६ धावा काढत सलग दुसरा विजय मिळवला. १९ वर्षीय हुड्डा "मॅन ऑफ द मॅच'चा मानकरी ठरला.

राजस्थानला अखेरच्या षटकात ६ चेंडूंवर विजयासाठी १२ धावांची गरज होती. त्या वेळी श्रीलंकेचा कर्णधार अँग्लो मॅथ्यूज गाेलंदाजी करीत होता. तळाचे फलंदाज मॉरिस आणि टीम साउथी फलंदाजी करीत होते. तळाचे फलंदाज खेळत असल्याने हा सामना दिल्ली जिंकेल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, या तळाच्या फलंदाजांनी सामना खेचून आणला. अखेरच्या सहा चेंडूवर १, २, १, ४, १, ४ अशा धावा निघाल्या. पहिल्या पाच चेंडंूवर ९ धावा झाल्या. अखेरच्या चेंडूवर ३ धावांची गरज होती. कोटलाच्या मैदानावर बसलेले ३५ हजार प्रेक्षक श्वास रोखून बसले होते. मॅथ्यूजने अखेरचा चेंडू फुललेंथ टाकला आणि टीम साउथीने तीन क्षेत्ररक्षकांना चकवून जबरदस्त कव्हर ड्राइव्ह खेचत चौकार मारला. हा चौकार जाताच राजस्थानच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. दुसरीकडे दिल्लीच्या पदरी पुन्हा निराशा पडली. त्यांचा हा आयपीएलमध्ये सलग अकरावा पराभव ठरला.

गुजराजच्या दीपक हुड्डाने अवघ्या २५ चेंडूंवर ५४ धावांची तुफानी खेळी करून राजस्थानला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. या युवा फलंदाजाला जीवदान देणे दिल्लीला चांगलेच महागात पडले. सुरुवातीला युवराजने हुड्डाला एकाेे धावेवर असताा धावबाद करण्याची संधी गमावली. नंतर मनोज तिवारीने त्याच झेल सोडला. दिल्लीने आपल्या घरच्या मैदानावर २०१३ मध्ये अखेरीस मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवला होता.

सर्वश्रेष्ठ गोलंदाजीनंतरही दिल्लीचा विजय नाही
डेअरडेव्हिल्ससाठी इम्रान ताहीरने (४/२८) चार गडी बाद केले. हे या स्पर्धेतील सर्वोत्तम प्रदर्शन ठरले आहे. द. आफ्रिकेच्या या फिरकीपटूने आपल्या चौथ्या आणि डावाच्या १९ व्या षटकात दोन गडी बाद केले. त्याने हुड्डा आणि फॉकनरला बाद करताना फक्त ७ धावा दिल्या. यानंतरही त्याची टीम जिंकू शकली नाही. याच इम्रान ताहीरने अडचणीच्या वेळी चांगली गोलंदाजी करून अखेरच्या षटकांत ६ चेंडूंत १२ धावा असे समीकरण केले. मात्र, मॅथ्यूजच्या अखेरच्या षटकाने त्याच्या मेहनतीवर पाणी फेरले.

युवीने काढल्या २७ धावा
तत्पूर्वी, दिल्लीने ३ बाद १८४ धावा काढल्या. त्यांच्याकडून कर्णधार जे.पी. डुमिनीने (नाबाद ४४) सर्वाधिक धावा काढल्या. सलामीवीर मयंक अग्रवालने ३७, तर श्रेयस अय्यरने ४० धावा काढल्या. आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू युवराजसिंगने १७ चेंडूंत २ षटकार ठोकून २७ धावा काढल्या. युवीला मिळालेल्या संधीचा लाभ उचलता आला नाही.
अखेरच्या षटकातील थरार, धावफलक आणि गुणतालिका पाहा पुढील स्लाइड्सवर...