आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभवाने इंग्लंड अडचणीत, श्रीलंका नऊ गड्यांनी विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेलिंग्टन - पहिल्या दोन सामन्यांतील फलंदाजीचे अपयश विसरून श्रीलंका संघाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जबरदस्त पुनरागमन केले. रविवारी इंग्लंडला ९ गड्यांनी हरवून विश्वचषकातील तिसरा विजय साजरा केला. उपांत्यपूर्व फेरीतही जागा पटकावली. लंकेकडून लाहिरू थिरीमाने (ना. १३९) व संगकाराने (ना. ११७) धावांचा पाऊस पाडला. इंग्लंडचा हा तिसरा पराभव. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी त्यांना आता बांगलादेश व अफगाणला हरवावेच लागेल.

प्रथम फलंदाजी करताना ज्यो रूटच्या झोकदार शतकाच्या (१२१) बळावर इंग्लंडच्या संघाने ३०९ धावांची विशाल धावसंख्या उभी केली. जोश बटलरने १९ चेंडूंत धुवाधार ३९ धावा चोपल्या. प्रत्युत्तरात थिरीमाने-दिलशान या जाेडीने १९ षटकांत १०० धावांची संघाला शानदार सलामी दिली.

ब्लंडर ऑफ द डे
रूट खलनायक

रूटने शतक झळकावून संघाला ३०० पार नेले होते. मात्र श्रीलंकेच्या फलंदाजीवेळी ब्रॉडच्या चेंडूवर पहिल्या स्लीपमध्ये थिरिमानेचा झेल त्याने सोडला. थिरिमाने तेव्हा सामन्यात ३ धावांवर होता. या वेळी मिळालेल्या जीवदानाचे रूपांतर त्याने शतकात केले.
बातम्या आणखी आहेत...