Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | News | LIVE 2nd Quarter-Final: Bangladesh V India At Melbourne Match LiveUpdate

IND vs BAN: टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडक, बांगला 'आऊट'

वृत्तसंस्था | Update - Mar 19, 2015, 05:35 PM IST

'विश्वचषक-2015' च्या दुसर्‍या क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाने बांगलादेश संघाला 109 धावांनी धूळ चारली. या विजयासह टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत सलामीवीर रोहित शर्माने (137) शानदार शतकाच्या जोरावर निर्धारित 50 षटकात 302 धावा ठोकल्या. विजयी लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेला बांगलादेश संघ 193 धावांवर ऑलआउट झाला.

 • LIVE 2nd Quarter-Final: Bangladesh V India At Melbourne Match LiveUpdate
  मेलबर्न- 'विश्वचषक-2015' च्या दुसर्‍या क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाने बांगलादेश संघाला 109 धावांनी धूळ चारली. या विजयासह टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत सलामीवीर रोहित शर्माने (137) शानदार शतकाच्या जोरावर निर्धारित 50 षटकात 302 धावा ठोकल्या. विजयी लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेला बांगलादेश संघ 193 धावांवर ऑलआउट झाला.
  टीम इंडियाचा गोलंदाज उमेश यादवने 4 तर मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. मोहित शर्माला एक विकेट घेण्याची संधी मिळाली. कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने विजयाचे शतक पूर्ण केले आहे.
  दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये शुक्रवारी (20 मार्च) तिसरी क्वार्टर फायनल खेळली जाणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघासोबत टीम इंडियाविरुद्ध सेमी फायनलमध्ये मैदानात उतरावे लागेल.
  बांगलादेशचा स्कोरबोर्ड
  फलंदाज आऊट धावा चेंडू 4 6
  तमीम इकबाल कॅ. धोनी बो. उमेश यादव 25 25 4 0
  इमरुल काइज रन आऊट 5 14 0 0
  सौम्या सरकार कॅ. धोनी बो. शमी 29 43 3 1
  महमदुल्लाह कॅ. शिखर बो. शमी 21 31 2 0
  शाकिब अल हसन कॅ. शमी बो. जडेजा 10 34 0 0
  मुशफिक्कुर रहीम कॅ. धोनी बो. उमेश 27 43 2 0
  सब्बीर रहमान कॅ. शमी बो. उमेश 30 40 2 0
  नासिर हुसेन कॅ. रोहित बो. जडेजा 35 34 6 0
  मुर्तजा कॅ. धोनी बो. मोहित 1 3 0 0
  रुबेल हुसेन कॅ. विराट बो. उमेश 0 3 0 0
  तस्किन नॉट आऊट 0 0 0 0

  महमदुल्लाहचा अवघड झेल केला सोपा
  महम्मद शमीच्या गोलंदाजीवर शिखर धवनने महमदुल्लाहचा सीमारेषेवर झेल घेतला. अगदी सीमेला लागून टिपलेला झेल असल्यामुळे पंचानी सावकाशपणे निर्णय दिला. धवनच्या हातातून प्रथम चेंडूने उसळी घेतली, त्यानंतर त्याने पुन्हा चेंडू आपल्या ताब्यात घेतला. तेव्हा त्याचा तोल गेला आणि धवनचा एक पाय सीमेपलिकडे पडणार तेव्हा त्याने चेंडू हवेत फेकून पुन्हा मैदानात येऊन झेल घेतला. महमदुल्लाहने 21धावा केल्या.

  बांगलादेशला एकापाठोपाठ दोन धक्का
  बांगलादेशचा सलामीचा फलंदाज तमीम इक्बाल उमेश यादवच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर इमरुल काइस धावचीत झाला. एका पाठोपाठ एक दोन फलंदाज तंबूत परतल्यानंतर बांगलादेशचा स्कोअर 6.4 षटकात 2 बाद 32 असा झाला. उमेशच्या गोलंदाजीवर इक्बाल विकेटकीपर धोनीकडून झेलबाद झाला. त्याने 25चेंडूत 25 धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर धावबाद झालेल्या इमरूलने 5 धावा केल्या.

  भारताच्या रोहित शर्मा (137) आणि सुरेश रैनाच्या (65) शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने बांगलादेशला 303 धावांचे आव्हान दिले आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत 6 विकेट गमावत 302 धावा केल्या. रवींद्र जडेजा (25) आणि आर. अश्विन (3) नाबाद राहिले. बांगलादेशच्या तस्किन अहमदने तीन तर मुर्तझा, रुबेल हुसैन आणि शाकिब अल हसन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

  रोहितची शानदार शतकी खेळी
  तस्किन अहमदच्या यॉर्कने कमाल करत रोहित शर्माचा त्रिफळा उडवला. रोहितने भारताला भक्कम स्थितीत नेऊन ठेवले. त्याने शतकी खेळी करत धावफलक हलता ठेवला. रोहितने 126 चेंडूत 137 धावा केल्या. त्यात 3 षटकार आणि 14 शानदार चौकारांचा समावेश होता.

  रैनाचे झुंझार अर्धशतक
  पाचव्या क्रमांकावर आलेलया सुरेश रैनाने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने 57 चेंडूत 65 धावा केल्या. त्यात एक उत्तुंग षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता. कर्णधार मश्रफे मुर्तझाच्या गोलंदाजीवर फटका लगावण्याच्या नादात रैना झेलबाद झाला.

  रोहितला जीवदान
  भारताचे आघाडीचे तीन फलंदाज एका पाठोपाठ बाद झाले असताना रोहित शर्मा भारताचा डाव सावरत आहे. दरम्यान, रोहित शर्माला देखील बाद करण्याची संधी बांगलादेशला मिळाली होती मात्र त्यांच्या खराब क्षेत्ररक्षणाने त्यांनी ती गमावली. 10 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नासिर हुसैनने स्वतःच्याच गोलंदाजीवर फॉलोथ्रू करताना रोहितला जीवदान दिले.

  भारताला पहिला धक्का
  भारताचा सलामीवीर शिखर धवन यष्टीचीत झाला. थोडे पुढे येऊन खेळण्याच्या नादात विकेटकिपरने त्याला बाद केले. शिखरने 50 चेंडूत 3चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या. त्याने रोहितसोबत 75 धावांची भागिदारी केली.

  विराट स्वस्तात बाद
  भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली बांगलादेशविरुद्ध अपयशी ठरला आहे. केवळ तिन धावांवर तो झेलबाद झाला. रुबेलच्या गोलंदाजीवर रहीमने त्याचा झेल टिपला.

  भारतचे स्कोरबोर्ड
  फलंदाज आऊट धावा चेंडू 4 6
  रोहित शर्मा बो. तस्किन 137 126 14 3
  शिखर धवन स्टंप रहीम, बो. शाकिब 30 50 3 0
  विराट कोहली कॅ. रहीम बो. रुबेल 3 8 0 0
  अजिंक्य राहाणे कॅ . शाकिब बो. तस्किन 19 37 1 0
  सुरेश रैना कॅ रहीम बो. मुर्तजा 65 57 7 1
  महेंद्रसिंह धोनी कॅ. हुसेन बो. तस्किन 6 11 0 0
  रवींद्र जडेजा नॉट आऊट 23 10 4 0
  आर. अश्विन नॉट आऊट 3 3 0 0

  भारतीय संघात आज कोणतेही परिवर्तन करण्यात आलेले नाही. वर्ल्डकपमध्ये भारताने आतापर्यंत सर्व सामने जिंकले आहेत, तर बांगलादेशाने सहा पैकी तीन सामने जिंकले आणि दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला. एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.

  पुढील स्लाइडमध्ये, वाचा आतापर्यंतचे विक्रम आणि सामन्याचे LIVE PHOTOS

 • LIVE 2nd Quarter-Final: Bangladesh V India At Melbourne Match LiveUpdate
  (फोटो - बांगलादेशचा फलंदाज तमिम इक्बाल शॉट खेळताना. )
 • LIVE 2nd Quarter-Final: Bangladesh V India At Melbourne Match LiveUpdate
  धावबाद झालेल्या इमरूलने 5 धावा केल्या. 
 • LIVE 2nd Quarter-Final: Bangladesh V India At Melbourne Match LiveUpdate
  फोटो - अजिंक्य राहाणेला बाद केल्यानंतर बांगलादेशचे  तास्किन अहमद आणि शाकिब अल हसन यांनी असा आनंद साजरा केला. 
 • LIVE 2nd Quarter-Final: Bangladesh V India At Melbourne Match LiveUpdate
  रैनाने शानदार 65 धावा केल्या. 
 • LIVE 2nd Quarter-Final: Bangladesh V India At Melbourne Match LiveUpdate
  फोटो - शिखर धवनने आज भारताला चांगली सुरुवात करुन दिली.  त्याला बांगलादेशचा विकेटकीपर मुस्फिकुर रहीमने यष्टीचीत केले. 
 • LIVE 2nd Quarter-Final: Bangladesh V India At Melbourne Match LiveUpdate
  शिखरने आज भारताला चांगली सुरुवात करुन दिली. शिखर धवनने 30 धावांची खेळी केली.  
 • LIVE 2nd Quarter-Final: Bangladesh V India At Melbourne Match LiveUpdate
  रोहित शर्माने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकर ठोकला. 
   
 • LIVE 2nd Quarter-Final: Bangladesh V India At Melbourne Match LiveUpdate
  कर्णधार धोनीने हवेत नाणेफेकले तेव्हा बांगलादेशचा कर्णधार मश्रफे मुर्तझा आणि पंच. 
 • LIVE 2nd Quarter-Final: Bangladesh V India At Melbourne Match LiveUpdate
  आतापर्यंतचे विक्रम
  - इंडिया आणि बांगलादेश यांच्यात एकूण 28 वन डे सामने झाले आहेत. त्यापैकी 24 भारताने तर बांगलादेशने 3 सामने जिंकले आहेत. एक सामना टाय झाला होता.
  - वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले आहेत. त्यापैकी दोघांनी एक एक विजय मिळवला आहे.
  - प्रथमच हे दोनही संघ नॉकआऊट फेरीत एकमेकांसमोर असतील. त्याआधीचे दोन्ही सामने साखळी फेरीत झाले होते.
  - भारताकडून वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशच्या विरोधात दोन शतके झळकली आहेत. वीरेंद्र सेहवागच्या 175 आणि विराट कोहली 100 यांचा त्यात समावेश आहे.
  - धोनीला अद्याप बांगलादेशच्या विरोधात विश्वचषकात खाते खोलता आलेले नाही. तो 2007 मध्ये केवळ 3 चेंडू खेळून 0 वर बाद झाला होता.
  - 2007 मध्ये बांगलादेशने सामना जिंकला होता. त्यावेळी मशरफ मुर्तजाने 4 बळी घेतले होते. तो आता बांगलादेशचा कर्णधार आहे.
  - बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला अद्याप भारताविरोधात विश्वचषकात शतक करता आलले नाही. तमिम इकबालने 2011 मध्ये सर्वाधिक 70 धावा केल्या होत्या.
  - बांग्लादेशच्या टीममध्ये गेल्यावेळी भारताविरुद्ध खेळलेले 6 प्लेयर्स आहेत.
  - भारताच्या केवळ धोनी आणि कोहलीने गेल्यावेळी विश्वचषकात बांगलादेशच्या विरोधातील सामना खेळला होता.
 • LIVE 2nd Quarter-Final: Bangladesh V India At Melbourne Match LiveUpdate
  बांगलादेश प्रथमच क्वार्टर फायनलमध्ये खेळत आहे. त्यांचे अनेक चाहते आजचा सामना पाहाण्यासाठी ऑस्ट्रेलियात आले आहेत. 

Trending