आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE IPL, 17th Match: Delhi Daredevils Vs Mumbai Indians At Delhi, Apr 23, 2016

IPL: दिल्ली डेअरडेव्हिल्सची मुंबई इंडियन्सवर मात; सॅमसनचे अर्धशतक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संजू सॅमसन (६०), जे. पी. डुमिनी (नाबाद ४९) यांच्या शानदार फलंदाजीनंतर गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने मुंबई इंडियन्सवर १० धावांनी रोमांचक विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १६४ धावा काढल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला ७ बाद १५४ धावाच काढता आल्या. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत ६ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे, तर मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे.

रोहितचे अर्धशतक व्यर्थ
धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक ठोकताना ६५ धावा काढल्या. त्याच्याशिवाय कृणाल पंड्याने ३६, अंबाती रायडूने २५ धावांचे योगदान दिले. पोलार्डने १८ चेंडूंत १९ धावा काढल्या. रोहितने ४८ चेंडूंचा सामना करताना १ षटकार, ७ चौकारांसह ही खेळी केली.

"सॅमसन खणखणला'
प्रथम फलंदाजी करणाऱ्या यजमान दिल्लीकडून युवा फलंदाज संजू सॅमसनने सर्वाधिक ६० धावा काढत अर्धशतक ठोकले. सॅमसनने ४८ चेंडूंत २ षटकार, ४ चौकार मारले. त्याच्याशिवाय द. आफ्रिकेचा खेळाडू जे.पी. डुमिनीने नाबाद ४९ धावांचे योगदान दिले. या दोघांमुळे दिल्लीने १६४ धावांचा टप्पा गाठला.
आजचे सामने
> गुुजरात लायन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, थेट प्रक्षेपण दु. ४.०० वाजेपासून
> रायझिंग पुणे सुपर जायंट्स वि. काेलकाता नाइट रायडर्स, थेट प्रक्षेपण रा. ८.०० वाजेपासून
सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय
हैदराबाद | सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (५९) आणि शिखर धवन (४५) यांच्या ९० धावांच्या सलामीच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबवर ५ गड्यांनी आयपीएलच्या नवव्या सत्रात शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने २० षटकांत ६ बाद १४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने १७.५ षटकांत ५ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात माॅर्गनने २५ धावांचे योगदान दिले.
तत्पूर्वी, पंजाबकडून शॉन मार्शने ४० तर अक्षर पटेलने नाबाद ३६ धावा केल्या. निखिल नाईकने २२ धावा जोडल्या. अक्षर आणि निखिलने ५० धावांची भागीदारी केली. मुरली विजय (२), मनन वोहरा (२५),तर कर्णधार डेव्हिड मिलर ९ धावा करून बाद झाले. सनरायझर्सकडून ४ षटकांत ९ धावा देत २ गडी बाद करणारा मुस्ताफिजूर रहेमान सामनावीर ठरला.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, धावफलक, गुणतालिका आणि संबंधित फोटोज...