आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार-विजय पाटील थेट लढत, एमसीए अध्यक्षपदासाठी समाेरासमाेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या द्वैवार्षिक निवडणुकीला रंगत यायला लागली असून बाळ महाडदळकर गटाने २४ तास आधीच आपले सर्व अंतिम उमेदवार जाहीर केले आहेत. त्यांचा गटाच्या एकापेक्षा अधिक फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांनी माघारीचे फॉर्म आजच दाखल केल्यामुळे अध्यक्षपदासाठी शरद पवार आणि विजय पाटील यांच्यात सरळ लढत होणार हे निश्चित झाले आहे.
उपाध्यक्षपदासाठी दिलीप वेंगसरकर आणि आशिष शेलार यांना पाटील गटाचे अॅबी कुसविल्ला अाणि शिवसेनेचे राहुल शेवाळे यांचे आव्हान असेल. संयुुक्त सचिवपदासाठी दोन जागांसाठी पी. व्ही.शेट्टी रवी सावंत हे उमेदवार महाडदळांच्या गटाने उतरवले. त्यांना लालचंद राजपूत आणि उन्मेश खानविलकर यांचे आव्हान असेल. कोशाध्यक्षपदासाठी नितीन दलाल मयांक खांडवाला यांच्यात सरळ लढत होईल. कार्यकारिणी समितीच्या ११ जागांसाठी महाडदळच्या गटाने सर्व विद्यमान कार्यकारिणी सदस्य उतरविले अाहेत.