आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेसीचा ५०० वा गाेल; बार्सिलाेनाचा विजय ला लीगा फुटबाॅल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - स्टार खेळाडू लियाेनेल मेसीने अापली टीम बार्सिलाेनासाठी दुहेरी कामगिरीचा धमाका उडवला. त्याने टीमसाठी ५०० वा गाेल केला. यासह त्याने संघाला राेमहर्षक विजय मिळवून दिला. बार्सिलाेना संघाने ला लीगा फुटबाॅल स्पर्धेत सेव्हिलाला धूळ चारली. या टीमने २-१ अशा फरकाने विजय मिळवला. मेसी (४३ वा मि.) अाणि लुईस सुअारेझ (६१ वा मि.) यांनी केलेेल्या गाेलच्या बळावर बार्सिलाेनाने सामना जिंकला. दुसरीकडे सेव्हिलाला पराभवाचा सामना करावा लागला. सेव्हिलासाठी विटाेलाे (१५ वा मि.) याने एकमेव गाेल केला. पिछाडीवर पडल्यानंतरही शानदार कलाटणी देऊन बार्सिलाेनाने सामन्यात विजयश्री खेचून अाणली. याशिवाय बार्सिलाेनाने अापला सलग दुसरा पराभव टाळला.

माद्रिदने शानदार विजय संपादन केला. या टीमने लेगानेसचा पराभव केला. माद्रिदने ३-० अशा फरकाने सामना जिंकला. गॅरेथ बेलने केलेल्या दाेन गाेलच्या बळावर माद्रिदला एकतर्फी विजयाची नाेंद करता अाली.


लियाेनेल मेसीचे ५९२ सामन्यांत ५०० गाेल
मेसीची बार्सिलाेना टीमकडील कामगिरी काैतुकास्पद ठरली अाहे. त्याने ५९२ सामन्यांत अातापर्यंत बार्सिलाेनाचे प्रतिनिधित्व केले. यासह त्याने या टीमसाठी ५०० गाेल केले अाहेत. त्याने सेव्हिलाविरुद्ध ४३ व्या मिनिटाला गाेल करून या अाकड्याला गवसणी घातली.
बातम्या आणखी आहेत...