Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | News | New Zealand Won Against South Africa In ICC Cricket World Cup 2015 First Semi Final

न्यूझीलंड फायनलमध्ये, रोमांचक सामन्यात द. आफ्रिकेवर केली मात

वृत्तसंस्था | Update - Mar 25, 2015, 03:57 AM IST

‘ड्रीम फायनल’ हे स्वप्न घेऊनच न्यूझीलंड आणि आफ्रिकेचे संघ मैदानावर उतरले होते. पहिल्यांदा फायनल खेळण्याचे स्वप्न होते. असे ४० वर्षांच्या वर्ल्डकपच्या इतिहासात कधीच घडले नव्हते. सर्वात मजेशीर म्हणजे न्यूझीलंडसाठी त्या ग्रँट एलियटने मॅच विजेता खेळी केली, ज्याने कधीकाळी दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याचे स्पप्न पाहिले होते. अर्थात, आफ्रिकेचा एका आफ्रिकनकडून झाला.

 • New Zealand Won Against South Africa In ICC Cricket World Cup 2015 First Semi Final
  ऑकलंड- ‘ड्रीम फायनल’ हे स्वप्न घेऊनच न्यूझीलंड आणि आफ्रिकेचे संघ मैदानावर उतरले होते. पहिल्यांदा फायनल खेळण्याचे स्वप्न होते. असे ४० वर्षांच्या वर्ल्डकपच्या इतिहासात कधीच घडले नव्हते. सर्वात मजेशीर म्हणजे न्यूझीलंडसाठी त्या ग्रँट एलियटने मॅच विजेता खेळी केली, ज्याने कधीकाळी दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याचे स्पप्न पाहिले होते. अर्थात, आफ्रिकेचा एका आफ्रिकनकडून झाला.

  सामन्याचे अखेरचे दोन षटक खूप रोचक होते. यावर खूप चर्चा रंगली. अखेरच्या १२ चेंडूंवर न्यूझीलंडला विजयासाठी २३ धावा, तर द. आफ्रिकेला ४ विकेटची गरज होती. दोघांच्या आशा जिवंत होत्या. फक्त कॉमनसेन्सने खेळताना दबाव झुगारायचा होता. न्यूझीलंडने असेच केले. त्यांनी एकही डॉट चेंडू खेळला नाही. २ चौकार, १ षटकार मारला. उर्वरित धावा पळून काढल्या. दोन वेळा बॅट चेंडूला लागली नाही, तर दोन बायच्या धावा काढल्या. द. आफ्रिकेसोबत सर्व उलट घडले. न्यूझीलंडला ७ चेंडंूत १४ धावांची गरज असताना त्यांनी एलियटचा झेल सोडला. हा फक्त १२ चेंडूंचा खेळ नव्हे, तर संपूर्ण सामन्यात असेच होत गेले. चोकर्स द. आफ्रिकेने दोन धावबादच्या चांगल्या संधी दवडल्या. तीन झेल सोडले. दुसरीकडे यजमान संघाने प्रत्येक संधीचे सोने केले. सामन्याचा हीरो एलियट ठरला. त्याने दबावात अँडरसनसोबत १०३, तर व्हिट्टोरीसोबत ३० धावांची भागीदारी केली. शिवाय स्टेनला षटकार खेचून त्यानेच सामना जिंकून दिला.

  तत्पूर्वी, द. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना डुप्लेसिस (८२), डिव्हिलर्स (६५), मिलर (४९) यांच्या खेळीच्या बळावर २८१ धावा काढल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे न्यूझीलंडला डकवर्थ लुईस नियमाने सुधारित २९८ धावांचे लक्ष्य मिळाले. यजमान संघाकडून मॅक्लुमने ५९, अँडरसनने ५८ तर एलियटने ८४* धावा काढल्या. मात्र, पावसाने आफ्रिकेचा खेळखंडोबा केला.

  मॅक्लुमचे अर्धशतक
  सामना एलियटने संपवला. मात्र, संघासाठी विजयाची पायाभरणी कर्णधार मॅक्लुमने केली. त्याने २२ चेंडूंत अर्धशतक ठोकले. स्टेन आफ्रिकेचे मुख्य शस्त्र आहे, हे माहिती होते. त्याने स्टेनलाच टार्गेट केले. त्याच्या तिसऱ्या षटकात २५ धावा कुटल्या. स्टेनला बदडल्याने द.आफ्रिकेची टीम सुरुवातीलाच बॅकफुटवर आली.

  षटकारासह पराभवाची मालिका खंडित
  दक्षिण अाफ्रिका भलेही विश्वचषकातून बाहेर झाली असली, तरी अाफ्रिकेचा एलियट फायनल खेळेल. न्यूझीलंडच्या विजयाचा हीराे ठरलेला एलियट हा मूळ दक्षिण अाफ्रिकेचा राहणारा अाहे. ताे २०१० पर्यंत याच ठिकाणी हाेता. तगडी स्पर्धा अाणि खेळाडूंच्या निवडीसाठी काेटा पद्धतीमुळे त्याला टीममध्ये स्थान मिळू शकले नाही. माजी कर्णधार केन रुदरफाेर्ड यांनी एलियटला अापल्याकडे बाेलावले. एलियटला हे याेग्य वाटले. त्याने न्यूझीलंडमध्ये वास्तव्य केले. त्यानंतर त्याचे अायुष्यच पार बदलून गेले.

  सात वर्षांनंतर मिळाली संधी
  एलियट हा २००१ मध्ये न्यूझीलंडला अाला हाेता. त्याला २००८ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसाेटी खेळण्याची संधी मिळाली. याच वर्षी त्याने वनडेतही पदार्पण केले. जानेवारी २०१३ मध्ये त्याला पुन्हा एकदा संघात सहभागी करण्यात अाले अाणि नाेव्हेंबरमध्ये पुन्हा बाहेरचा रस्ता दाखवण्यात अाला. १३ महिन्यांनंतर अचानक त्याला वर्ल्डकप टीममध्ये सहभागी करण्यात अाले. निशामच्या जागी त्याला संधी मिळाली. त्याच्यावर प्रचंड टीका झाली हाेती. मात्र, त्याने प्रत्युत्तर दिले.

  विश्वचषकात पहिले अर्धशतक ठाेकले
  एलियटने अाठ सामन्यांत अातापर्यंत ३८ च्या सरासरीने २२७ धावा काढल्या. विजयानंतर ताे म्हणाला की, ‘हा विजय टीमसाठीच नाही, तर या स्टेडियममधील चाहत्यांसाठी अाहे. ४५ हजार प्रेक्षकांनी प्रत्येक चेंडूचा अानंद लुटला. प्रथमच अंतिम फेरीत प्रवेशाचा अानंद काही अाैरच असताे. षटकार मारताना माझ्या डाेक्यात काही विचार सुरू नव्हता, असे ताे म्हणाला.

  स्कोअर बोर्ड
  दक्षिण अाफ्रिका धावा चेंडू ४ ६

  हाशिम अामला त्रि.गाे. बाेल्ट १० १४ २ ०
  डिकाॅक झे. साऊथी गाे. बाेल्ट १४ १७ २ ०
  डुप्लेसिस झे. राेंची गाे. अॅंडरसन ८२ १०७ ७ १
  राेसाेव झे. गुप्तिल गाेे.अॅंडरसन ३९ ५३ २ १
  एल्बी डिव्हिलर्स नाबाद ६५ ४५ ८ १
  मिलर झे. राेंची गाे. अॅंडरसन ४९ १८ ६ ३
  जेपी डुमिनी नाबाद ८ ४ १ ०
  अवांतर : १४.
  एकूण : ४३ षटकांत ५ बाद २८१. गडी बाद होण्याचा क्रम : १-२१, २-३१, ३-११४, ४-२१७, ५-२७२. गोलंदाजी : टीम साउथी ९-१-५५-०, ट्रेंट बाेल्ट ९-०-५३-२, मॅट हेन्री ८-२-४०-०, डॅनियल व्हिट्टाेरी ९-०४६-०, विल्यम्सन १-०-५-०, ग्रंॅट एलियट १-०-९-०, काेरी अॅंडरसन ६-०-७२-३.

  न्यूझीलंड धावा चेंडू ४ ६
  गुप्तिल धावबाद (अामला/डिकाॅक) ३४ ३८ ३ १
  मॅक्लुम झे. स्टेन गाे. माेर्कल ५९ २६ ८ ४
  विल्यम्सन त्रि. गाे. माेर्कल ६ ११ १ ०
  टेलर झे. डिकाॅक गाे. डुमिनी ३० ३९ ४ ०
  ग्रँट एलियट नाबाद ८४ ७३ ७ ३
  अॅंडरसन झे. डुप्लेसिस गाेे. माेर्कल ५८ ५७ ६ २
  राेंची झे. राेसाे गाे. डेल स्टेन ८ ७ १ ०
  डॅनियल व्हिट‌्टाेरी नाबाद ७ ६ १ ०
  अवांतर : १३. एकूण : ४२.५ षटकांत ६ बाद २९९ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-७१, २-८१, ३-१२८, ४-१४९, ५-२५२, ६-२६९. गोलंदाजी : डेल स्टेन ८.५-०-७६-१, फिलेंडर ८-०-५२-०, माेर्न माेर्कल ९-०-५९-३, इम्रान ताहिर ९-१-४०-०, जेपी डुमिनी ५-०-४३-१, एल्बी डिव्हिलर्स ३-०-२१-०.

  सामनावीर : ग्रॅंट एलियट.

  पुढील स्लाइडवर वाचा, असे कसे ठरले दुर्दैवी...

 • New Zealand Won Against South Africa In ICC Cricket World Cup 2015 First Semi Final
  असे कसे ठरले दुर्दैवी
  यात कसलीच शंका नाही की दबावात द. आफ्रिकेचा पराभव झाला. मात्र, हे पूर्ण सत्य नाही. हेसुद्धा तितकेच खरे आहे की ज्या वेळी त्यांच्या हाती मोठी संधी आली त्या प्रत्येक वेळी नशीब त्यांच्यावर रुसले. १९९२ मध्ये पहिल्या सेमीफायनलपासून आतापर्यंत नेहमी पावसाने त्यांचा खेळखंडोबा केला. जगाला क्षेत्ररक्षण शिकवणाऱ्या आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्ध धावबाद, झेलची संधी दवडली. संघाचा सुपरस्टार खेळाडूसुद्धा वर्ल्डकपमध्ये येऊन चुकला.  

   
 • New Zealand Won Against South Africa In ICC Cricket World Cup 2015 First Semi Final
  पावसाचा खेळखंडोबा
  पाऊस अाला त्या वेळी द. आफ्रिकेचा स्कोअर ३८ षटकांत ३ बाद २१७ धावा असा होता. त्यांनी आक्रमण सुरू केले होते. बॅटिंग पॉवरप्लेमध्ये ३२ धावासुद्धा झाल्या होत्या. मात्र, पाऊस आल्याने षटके कमी झाली.

   
 • New Zealand Won Against South Africa In ICC Cricket World Cup 2015 First Semi Final
  धावबादची संधी गमावली
  जगातल्या वेगवान क्षेत्ररक्षकांत डिव्हिलर्स टॉपवर येतो. डी. कॉक यष्टिरक्षक आहे. यानंतरही या दोघांनी धावबादच्या संधी गमावल्या. स्कूल क्रिकेटमध्ये दिसते तसे घडले.

  नंबर वन स्टेन सुपरफ्लॉप
  स्टेन जगातला नंबर वन गोलंदाज आहे. मात्र, वर्ल्डकपमध्ये विकेट टेकर्समध्ये तो १८ व्या क्रमांकावर राहिला. त्याने ३१.४५ च्या सरासरीने ११ बळी घेतले.

  ४२ व्या षटकात एलियटने मिडविकेटदरम्यान फटका खेळला. बेहर्डिनसाठी हा सोपा झेल होता. मात्र, डुमिनी मध्ये आल्याने हा झेल सुटला. डुमिनी धडकण्यापूर्वीच बेहर्डिनने हा झेल सोडला होता.    एलियनसारखा आला एलियट
  या वर्ल्डकपमध्ये ३९ धावा ही एलियटची सर्वोच्च कामगिरी होती. जन्माने आफ्रिकन असलेल्या एलियटने द. आफ्रिकेविरुद्धच केलेली ८४ धावांची खेळी कोणताही आफ्रिकन कधीही विसरू शकणार नाही.

  १९९२ : इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल जिंकण्यासाठी १३ चेंडूंत २२ धावांची गरज होती. मध्येच पाऊस आला. यानंतर एका चेंडूवर २१ धावांचे अशक्य लक्ष्य मिळाले. आफ्रिका हरली.

  १९९९ मध्ये टायने आफ्रिका बाहेर
  सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने २१३ धावा काढल्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेचा डावही याच स्कोअरवर आटोपला. सुपरसिक्समध्ये आफ्रिकेवर विजय मिळवल्याच्या आधारावर ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये प्रवेश केला.

   
 • New Zealand Won Against South Africa In ICC Cricket World Cup 2015 First Semi Final
  न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर दक्षिण अाफ्रिकेच्या अनेक खेळाडूंना मैदानावर रडू काेसळले. माेर्न माेर्कललाही पराभवाचा धक्का बसला. ताे जागेवरच बसून हाेता. धीर देत त्याला खेळाडूंनी सावरले.

Trending