आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीअायचे तब्बल 1792 काेटींचे नुकसान; अाता मिळणार 1856 काेटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महसुलाच्या बाबतीत अायसीसीला दर्शवलेला विराेध अाता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला चांगलाच महागात पडला अाहे. याच विराेधामुळे बीसीसीअायचे तब्बल १७९२ काेटींनी नुकसान झाले अाहे. कारण, अायसीसीच्या वतीने यापूर्वी बीसीसीअायला ३६४८ काेटींचा निधी मिळत हाेता. यामध्ये अाता माेठ्या प्रमाणात कपात करण्यात अाली. नव्याने अाता बीसीसीअायच्या पदरामध्ये केवळ २९.३ काेटी डाॅलर (१८५६ काेेटी) रुपये पडणार अाहेत.   
 
अायसीसीच्या दुबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये बीसीसीअायला इतर सदस्य देशांनी पाठबळ दिले नाही. यामध्ये इंग्लंड अाणि अाॅस्ट्रेलियन क्रिकेट मंडळांचा समावेश अाहे. त्यामुळे विराेध दर्शवणारे बीसीसीअाय हे एकमेव क्रिकेट मंडळ असल्याचे दिसून अाले. यातून अायसीसीने नव्या महसुलाच्या माॅडेलची अंमलबजावणी करण्याचा निर्णय एकमताने घेतला. याला इतर सर्व सदस्य क्रिकेट मंडळांनी सहमती दर्शवली. मात्र, याचा सर्वात माेठा फटका बीसीसीअायला बसणार अाहे. कारण, अायसीसीकडून मिळणाऱ्या अार्थिक निधीत माेठी कपात हाेणार अाहे.  
अाॅस्ट्रेलिया, इंग्लंडचा फायदा : भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाेबत अायसीसीला विराेध करणाऱ्या इंग्लंड अाणि अाॅस्ट्रेलियन क्रिकेट बाेर्डांनी वेळीच माघार घेतली. यामुळे दाेन्ही देशांचे काेणतेही नुकसान झाले नाही. इंग्लंडच्या निधीमध्ये थाेडी कपात झाली. यापूर्वी, इंग्लंडला १५ काेटी डाॅलर मिळायचे. अाता ही रक्कम १४.३ काेटी डाॅलर असेल. दुसरीकडे अाॅस्ट्रेलियाला मिळणार १३.२ काेटींचा निधी कायम अाहे. 
  
मनोहर यांच्यावर नाराजी : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनीच आयसीसीचे अध्यक्ष असताना बिग थ्रीचे मॉडल रद्दबातल करण्याचा आग्रह केला होता. यामुळे मनोहरवर बीसीसीआय नाराज आहे.

नव्या माॅडेलनुसार असा मिळणार निधी  
१. बीसीसीअाय : २९.३ काेटी डाॅलर (अाठ वर्षांपर्यंत), 
२. इंग्लंड : १४.३ काेटी डॉलर.
३. झिम्बाब्वे : ९.४ काेटी डॉलर. 
४. इतर सदस्य देश (अाॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, द. अाफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, वेस्ट इंडीज) : १३.२ कोटी डॉलर.
५. असाेसिएट सदस्य देश : २८ काेटी डॉलर.
 
बातम्या आणखी आहेत...