आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीव्ही सिंधू कोरियन ओपन सुपर सिरीजच्या फायनलमध्ये, सेमिफायनलमध्ये चीनचा पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फायनलमध्ये तिची लढत नोझोमी ओकुहारा हिच्याशी होणार आहे. - Divya Marathi
फायनलमध्ये तिची लढत नोझोमी ओकुहारा हिच्याशी होणार आहे.
स्पोर्ट्स डेस्क - कोरियन ओपन सुपर सिरीजच्या सेमिफायनलमध्ये पी.व्ही. सिंधूने चीनला पराभूत केले आहे. सेमिफायनलमध्ये सिंधूची लढत बिंगजुआओला हिच्याशी झाली होती. या विजयासह पी.व्ही. सिंधू कोरियन ओपन सुपर सिरीजच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. 
 
 
भारताची नंबर एकची महिला सिंगल शटलर हिने चीनच्या बिंगजिआओ हिला 21-10, 17-21, 21-16 अशा अंकांनी 66 मिनिटांत पराभूत करत फायनलमध्ये स्थान मिळवले. सुरुवातीला सिंधू बिंगजिआओसमोर डगमगली मात्र, काही मिनिटांतच सावरून तिने सेमिफायनलमध्ये लीड घेतली. तिच्या या यशानंतर भारतातून कौतुकांचा वर्षाव केला जात आहे. रविवारी फायनलमध्ये तिची लढत नोझोमी ओकुहारा हिच्याशी होणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...