आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीव्ही सिंधूशी एअरलाइन्स स्टाफने केले गैरवर्तन, बॅडमिंटन स्टारने ट्विट केल्या भावना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्टार बॅडमिंटन प्लेअर पीव्ही सिंधूशी इंडिगो एअरलाइन्सच्या ग्राउंड स्टाफने गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला सिलव्हर मेडल मिळवून देणाऱ्या बॅटमिंटन स्टारने या घटनेवर नाराज होऊन आपल्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत. आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तनावर आश्चर्य वाटत असल्याचे तिने सांगितले आहे. हैदराबाद ते मुंबईला जात असताना तिच्यासोबत हा प्रकार घडला आहे. 
 
काय म्हणाली सिंधू?
> पीव्ही सिंधूने लिहिल्याप्रमाणे, "अतिशय खेदपूर्वक सांगावे लागत आहे, की 4 नोव्हेंबर रोजी मी 6E 608 फ्लाइटने मुंबईला जात असताना ग्राउंड स्टाफ मि. अजितेशने माझ्यासोबत गैरवर्तन केले. हा अनुभव अतिशय वाइट होता."
> यानंतर सिंधूने दुसरे ट्वीट केले आणि आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये मुंबईला बॉम्बे लिहिल्याबद्दल माफी मागितली.
> सिंधूने सांगितल्याप्रमाणे, "ग्राउंड स्टाफ (स्किपर) मिस्टर अजितेशने माझ्याशी अतिशय उद्धटपणे बोलून माझ्याशी गैरवर्तन केले. याची तक्रार मी एयर होस्टेस आशिमाकडे केली. मात्र, अजितेशने आशिमाला सुद्धा उलट-सुलट बोलण्यास सुरुवात केली तेव्हा मला धक्काच बसला."
> एअरलाइन्स कंपनीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. दोषी सापडल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल असे आश्वासनही देण्यात आले आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, सिंधूचे ट्वीट्स...
बातम्या आणखी आहेत...