आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकच्या करुण नायरने रचला रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावांचा RECORD

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईत सुरू असलेल्या रणजी चषकाच्या अंतिम सामन्यात करुण नायरने रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम रचला आहे. त्याने 328 धवा केल्या. त्रिशतक पूर्ण करत तो रणजीमध्ये सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटूही बनला आहे.
फोटो - विक्रमी खेळी करणारा करुण नायर.
मंगळवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 6 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या 23 वर्षीय नायरने ने 328 धावांची खेळी केली. बुधवारी 319 धावांचा टप्पा ओलांडताच रणजीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर रचला गेला. याआधी हा विक्रम गुल मोहम्मदच्या नावे होता. त्याने 1946-47 मध्ये 319 धावा केल्या होत्या.

त्याचबरोबर गुंडप्पा विश्वनाथ यांच्या 247 धावांचा विक्रमही त्याने मागे टाकला आहे. 297 धावांवर खेळत असताना एक रिव्हर्स स्वीप फटका मारत त्याने त्रिशतक पूर्ण केले होते. त्याआधी त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी नाबाद 151 अशी होती.
करुण नायरच्या इनिंगबाबत वाचण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...