आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्रांती नाही, टीममधून हकलून दिले; रवींद्र जडेजाने ट्वीट करून मांडली व्यथा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वनडे सिरीजमध्ये सुरुवातीच्या तीन सामन्यांसाठी टीमची घोषणा झाली. यात रवींद्र जडेजाला स्थान मिळालेले नाही. त्याला विश्रांती देण्यात आली आहे अशी चर्चा होती. यापूर्वी त्याला श्रीलंका दौऱ्यात विश्रांती देण्यात आली होती. त्यावेळी जडेजासह इतर काही सदस्यांना विश्रांती देत असल्याचे निवड समितीने सांगितले होते. मात्र, यावेळी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजमध्ये सुद्धा नाव न आल्याने अखेर जडेजाने मौन सोडले. 
 
 
जडेजाने केले असे ट्वीट...
- टीम जाहीर झाल्यानंतर रवींद्र जडेजाने एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये, 'आपल्या अपयशापेक्षा कमबॅक अधिक स्ट्राँग करा.' असे तो म्हणाला.
- यावरून स्पष्ट होतेय की तो उपलब्ध असतानाही त्याला डावलण्यात आले आहे. 
- टीममध्ये उमेश यादव आणि मोहम्मद शमीचे कमबॅक झाले आहे. त्यांना श्रीलंका दौऱ्यात विश्रांती देण्यात आली होती. 
- जडेजाला सुद्धा परत टीममध्ये घेणार अशी शक्यता होती. मात्र, त्याला पुन्हा डावलण्यात आले. त्याची व्यथा त्याने ट्वीटरवर व्यक्त केली. पण, काही मिनिटांतच संबंधित ट्वीट आपल्या अकाउंटवरून डिलीट देखील केले.
बातम्या आणखी आहेत...