आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अामलाने 4 वर्षांत 16 वेळा माेडले काेहलीचे विक्रम!; कमी डावांत 26 वे शतक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंबर्ली- दक्षिण अाफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज हाशिम अामला बांगलादेशविरुद्ध पहिल्या वनडेत चमकला. त्याने टीमच्या विक्रमी विजयात माेलाचे याेगदान दिले. त्याने यामध्ये ११० धावांची तुफानी शतकी खेळी केली. यासह त्याने कमी डावांत २६ वे शतक ठाेकण्याचा नवा विक्रम अापल्या नावे केला. हा अामलाचा क्रिकेट करिअरमधील १५४ वा डाव हाेता. यासह त्याने टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीला मागे टाकले. काेहलीच्या नावे सर्वात कमी १६६ डावांत २६ वे शतक ठाेकण्याचा विक्रम नाेंद हाेता.   
 
दक्षिण अाफ्रिकेच्या हाशिम अामलाने यातून काेहलीला मागे टाकण्याचा पराक्रम गाजवला. त्याने हे यश एकदाच मिळवले असे नाही. त्याने चार वर्षांत तब्बल १६ वेळा काेहलीला विक्रमामध्ये मागे टाकले.  
 
२०१३ पासून झाली सुरुवात 
 अामलाने   काेहलीला विक्रमात मागे टाकण्याच्या माेहिमेला २०११ मध्ये सुरुवात केली. त्याने ११ वे शतक ठाेकले हाेते. काेहलीच्या नावे ८२ डावांत ११ शतकांची नाेंद हाेती.  अामलाने ६४ डावांत हा पल्ला गाठला. 

अाफ्रिकेचा बिनबाद सर्वात माेठे लक्ष्य गाठण्याचा विक्रम 
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना सात बाद २७८ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात अाफ्रिकेने अामला (११०) व  डिकाॅकच्या (१६८) द्विशतकी भागीदारीच्या बळावर बिनबाद विजयाचे लक्ष्य गाठले. यासह अाफ्रिकेच्या नावे ४६ वर्षांनंतर  विक्रमाची नाेंद झाली. यापूर्वीचा विक्रम इंग्लंड टीमच्या नावे हाेता. इंग्लंडने २०१६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध बिनबाद २५५ धावांचे लक्ष्य गाठले हाेते. भारतानेही  बिनबाद १९७ धावा पूर्ण केल्या हाेत्या. भारताने १९९८ मध्ये झिम्बाव्वेविरुद्ध हा पराक्रम गाजवला हाेता.
बातम्या आणखी आहेत...