Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | News | Rubel Hossain Arguments After Virat Kohli Out Just 3 Run

PHOTOS:विराटला बाद केल्यानंतर बांगलादेशी बॉलरने वापरले अपशब्द

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 19, 2015, 03:14 PM IST

टीम इंडियाचा धुरंधर फलंदाज स्वस्तात बाद केल्यानंर बांगलादेशी बॉलर रुबेल हुसैन एवढा आनंदीत झाला जणू त्याने वर्ल्डकप जिंकला आहे.

 • Rubel Hossain Arguments After Virat Kohli Out Just 3 Run
  विराट कोहली बांगलादेशाविरुद्ध फक्त तीन धावा काढून बाद झाला. टीम इंडियाचा धुरंधर फलंदाज स्वस्तात बाद केल्यानंतर बांगलादेशी बॉलर रुबेल हुसैन एवढा आनंदीत झाला जणू त्याने वर्ल्डकप जिंकला आहे. विराटला बाद करणे हे विरोधी संघासाठी सोपे काम नसते हे मान्य, पण ज्या पद्धतीने रुबेलने जल्लोष केला त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

  विराटबद्दल अपशब्द
  रुबेल सामन्याच्या 17 व्या षटकात गोलंदाजी करत होता. षटकाच्या पाचव्या चेंडूवर विराट कोहलीने ड्राइव्ह केला पण बॅटच कट लागल्याने चेंडू थेट विकेटकीपर मुशफिक्कुर रहीमच्या हातात गेला. नाराज झालेला विराट पॅव्हेलियनकडे परतत होता. त्याला पाहून रुबेलने सहकारी खेळाडूंसोबत जल्लोष करत अपशब्द वापरले.

  वळूनही पाहिले नाही
  फक्ती तीन धावांवर बाद झाल्याने नाराज झालेल्या विराटने रुबेलच्या बोलण्याला महत्त्व न देता शांतपणे पॅव्हेलियनमध्ये परतला. रुबेलच्या या कृत्याला कॉमेंट्री पॅनलमधील आकाश चोपडा आणि शोएब अख्तर यांनी देखील चुकीचे ठरविले. ते म्हणाले, पहिले विकेट मिळाल्यानंतर बॉलर जल्लोष करत असायचे आता, परिस्थिती बदलली आहे. विकेट मिळाल्यानंतर बॉलर अभ्रद्र कॉमेंट करायला आता विसरत नाहीत.

  पुढील स्लाइडमध्ये फोटोज् मधून पाहा, विराटला बाद केल्यानंतर रुबेल हुसैनने काय काय केले

 • Rubel Hossain Arguments After Virat Kohli Out Just 3 Run
  विराटला बाद केल्यानंतर वर्ल्डकप जिंकल्याचा आनंद रुबेलला झाला होता. 
 • Rubel Hossain Arguments After Virat Kohli Out Just 3 Run
  विराट बाद झाल्यानंतर शांतपणे पॅव्हेलियनकडे निघाला असताना रुबेल त्याच्या दिशेने येत होता, त्याला त्याच्या सहकार्‍यांनी रोखले. 
 • Rubel Hossain Arguments After Virat Kohli Out Just 3 Run
  भारतीय फलंदाजांना बाद केल्यानंतर बांगलादेशींनी असा जल्लोष केला. 
 • Rubel Hossain Arguments After Virat Kohli Out Just 3 Run
  विराट पॅव्हेलियनकडे निघाला असताना रुबेल काहीतरी पुटपुटत असल्याचे दिसते. 

Trending