आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसूरी येथील 'सचिन चा आशियाना' होणार जमीनदोस्त...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सचिन तेंडुलकरचे मित्र आणि बिजनेस पार्टनर संजय नारंग यांनी मसूरी येथे बांधलेले 'सचिन का आशियाना' अनाधिकृत बांधकाम म्हणून पाडला जाणार आहे. सचिन जेव्हा मसूरी यायचा तेव्हा, आवर्जून तो याच घरात थांबत होता. या घराचे नाव सचिन चा आशियाना असे का पडले हे जाणून घेऊ....
 

- ढहलिया बँक हाऊसचे मालक संजय नारंग आहेत. नैनीताल हायकोर्टाने घराची इमारत अनाधिकृत बांधकाम घोषित करून ते जमीनदोस्त करण्याचे आदेश बजावले आहेत. 
- संजय नारंग यांनी केलेल्या विशेष अपीलवर सुनावणी घेताना हायकोर्टाने केंट बोर्ड मसूरीला या इमारतीच्या पुलावर आणि तलावावर दुबार सुनावणी करण्याचे आदेश सुद्धा दिले. 
- मंगळवारी हायकोर्टाचे मुख्य न्यायधीश केएम जोसेफ आणि न्यायधीश व्हीके बिष्ट यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. 
- संजय नारंग यांनी याचिका दाखल करून 6 नोव्हेंबर 2014 रोजी केंट बोर्डाने दिलेल्या आदेशाला आव्हान दिले होते. त्यामध्ये जवळपास 28 हजार चौरस फुटावर बांधलेली ही इमारत उद्ध्वस्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. 
 

काय आहे वाद?
- संजय नारंग यांनी ढहलिया बँक ही इमारत आरएल दुग्गल यांच्याकडून खरेदी केली होती. संजय यांनी बांधकामासाठी नाहर्कत मागितला होता. मात्र, तो मिळाला नाही. यानंतर डागडुजीच्या नावावर बांधकाम करण्यात आले. 
- उल्लेखनीय बाब म्हणजे, मसूरीच्या लाल टिब्बा परिसरात 1.67 एकर परिसरात पसरलेल्या हा बंगला लंढौर कैंटोनमेंट बोर्ड परिसरात मोडतो. त्याच्या शेजारीच डीआरडीओची एक लॅब आहे. 
- नोव्हेंबर 2012 ते 2014 पर्यंत कथितरीत्या या घराच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू होती. 
- सचिन जेव्हा 2014 मध्ये न्यु इयर पार्टीसाठी मसूरी आला होता, तेव्हा नारंग यांनी बंगल्याचा गृहप्रवेश केला होता. 
 

स्वीमिंग पूलसह 50 सीटर थिएटर
- ढहलिया बैंक हाउस 100 वर्षे जुन्या शैलीत बांधण्यात आले आहे. 
- बंगल्यात स्वीमिंग पूल, टेनिस कोर्ट, बिलियर्ड स्नूकर रूम, बार रूम आणि 50 सीटचे थिएटर आहे.
- बंगल्यात एकूण 6 बेडरूम आहेत. समुद्र सपाटीपासून 7500 फुट उंचीवर बांधलेला हा बंगला हुबेहूब उत्तराखंडच्या सीएम हाऊससारखा आहे. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...