आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal Is Big Fan Of Cricket God Sachin Tendulkar And Team India

टीम इंडियाची फॅन आहे सायना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - भारतीय बॅडमिंटन जगताची ओळख ठरलेल्या सायना नेहवालने वर्ल्डकप क्रिकेटच्या वेळीच वर्ल्ड नंबर वन होण्याचा मान मिळवला होता. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर बॅडमिंटनमध्ये सायना नंबर वन बनल्याची घटना भारतीय क्रीडा प्रेमींसाठी दिलासा देणारी ठरली. हा आनंद तसा मोठा होता.
कारण, चायनीज, कोरियन सुपर पॉवरला मागे टाकून नंबर वनचे सिंहासन मिळवत सायनाने भारतीय तिरंग्याची शान वाढवली. मात्र, ही बॅडमिंटन स्टार स्वत: भारतीय क्रिकेटची मोठी फॅन आहे. सायनाने या वेळी वर्ल्डकपचे भारताचे सामने पाहिले आणि जल्लोष सुद्धा केला. आई उषा नेहवालने दिलेल्या माहितीनुसार सायनाला क्रिकेटचे वेड आहे. ती क्रिकेटचे सामने नेहमी बघत असते. सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर सायना खूप निराश झाली होती. सायना स्वत: देशासाठी खेळते. यामुळे पराभवानंतर खेळाडूंची काय अवस्था होते, हे तिला चांगले ठाऊक आहे, असे तिच्या आईने सांगितले
एनएच-१० बघितला सायनाने

चित्रपट बघण्याची संधी तशी खूप कमी मिळते. मात्र, सायनाने इतक्यात एनएच-१० हा चित्रपट पाहिला आहे. सायनाने हा चित्रपट सहकुटुंब बघितला. सर्वांना हा चित्रपट आवडला. ती सुद्धा स्क्रीनवर आली. कॉमेडी नाइट‌्स शोमध्ये कपिलसोबत सायनाने खूप धम्माल केली. लाजाळू सायनाला लोकांनी पहिल्यांदा टीव्हीवर बिनधास्तपणे बोलताना, हसताना पाहिले. या वेळी तिचे वडील हरवीर नेहवाल उपस्थित होते. या शोमध्ये जाऊन खूप मज्जा आल्याचे सायनाने घरी आल्यानंतर आईला सांगितले. सर्वांनी असेच हसत राहिले पाहिजे, असे तिला वाटते. सायना अनुपमच्या शोलासुद्धा गेली आहे.
अडचणीत टीम सायना कामी आली

एकवेळ अशीसुद्धा आली होती जेव्हा सायनाला किताब जिंकणे खूप कठीण झाले होते. ती फॉर्मात नव्हती. सर्व मोठ्या स्पर्धेच्या पहिल्या, दुसऱ्या फेरीत किंवा क्वार्टर फायनलमध्ये ती पराभूत होत होती. अशा संकटाच्या वेळी तिचे आई-वडील आणि कोच विमलकुमार यांनी सायनाला बळ दिले. घरी आई उषा नेहवाल आणि वडील हरवीर तिच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे होते. तर ट्रेनिंगच्या वेळी कोच विमलकुमार यांना सायनाला पुन्हा उभे केले. हळूहळू मेहनत रंगात आली. हळूहळू सायना लयीत आली. २०१५ चे वर्ष सायनासाठी कारकीर्दीतील सर्वांत संस्मरणीय वर्ष ठरले. तिकडे टीम सायनासुद्धा आनंदित होती.