आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशाकडून क्रिकेट खेळणार हा Indian, 5 महिन्यांपूर्वीच मिळाले नागरिकत्व...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिमरनजीत सिंह याची भारताकडूनच खेळण्याची इच्छा होती. - Divya Marathi
सिमरनजीत सिंह याची भारताकडूनच खेळण्याची इच्छा होती.
स्पोर्ट्स डेस्क - गुरिंदर संधु आणि ईश सोढीनंतर आणखी एक पंजाबी क्रिकेटर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या देशाकडून खेळणार आहे. मोहालीत राहणारा सिमरनजीत सिंह आयरलंड टीममध्ये राहून बुधवारी वेस्टइंडीज विरोधात आपला डेब्यू करणार आहे. विशेष म्हणजे, त्याला अवघ्या 5 महिन्यांपूर्वीच त्याला आयरलंडचे नागरिकत्व मिळाले आहे. 
 

- 13 सप्टेंबर रोजी वेस्ट इंडीज विरुद्ध होणाऱ्या टेस्ट मॅचसाठी त्याला आयरलंडच्या टीममध्ये जागा मिळाली आहे. 
- याच वर्षी 22 जून रोजी आयरलंडला टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या देशाचा दर्जा मिळाला होता. आता सिमरनजीत उर्फ सिमी याच देशातून आंतरराष्ट्रीय डेब्यू करत आहे. 
- सिमरनजीत सिंह याची भारताकडूनच खेळण्याची इच्छा होती. मात्र, त्याची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. 
- त्याला टेस्ट क्रिकेट सर्वाधिक पसंत आहे. आता तो त्याच फॉरमॅटमध्ये आपला डेब्यू करणार आहे. 
- 2004 मध्ये स्टेट इंटर डिस्ट्रिक्ट अंडर-17 चॅम्पियनशिपमध्ये त्याने तब्बल 725 धावा केल्या होत्या.
- 2001 मध्ये विजयवाडा येथे खेळल्या गेलेल्या 46 व्या नॅशनल स्कूल गेम्समध्ये तो बेस्ट प्लेअर म्हणून चर्चेत आला होदा. 
- सात वर्षे त्याने पंजाबच्या जुनिअर संघात धडाकेबाज प्रदर्शन केले आहे. तरीही त्याला अंडर-19 मध्ये जागा मिळाली नाही.
 

एप्रिलमध्येच मिळाले नागरिकत्व
- सिमीला वनडे डेब्यू करण्यापूर्वी एप्रिलमध्ये आयरलंडने नागरिकत्व दिले होते. 
- सिमीचा जन्म मोहालीत झाला. सेंट सोल्जर अकॅडमीत त्याने क्रिकेटची सुरुवात केली. याच ठिकाणी तो ऑलराउंडर क्रिकेटर म्हणून उदयास आला. 
- टीममध्ये निवड झाल्याने तो खूप आनंदी आहे. आयरलंडमध्ये या देशाचे क्रिकेट युनिफॉर्म घालण्याचे स्वप्न पाहून तो आला होता. त्याचे स्वप्न साकार झाले आहे.
- सिमरनजीतचे कोच भारती विज यांनी सांगितल्याप्रमाणे, ट्रायसिटी मोहालीसाठी हे मोठे यश आहे. सिमीने स्वतःला एक मोठा खेळाडू म्हणून सिद्ध करून दाखवले तसेच टीकाकारांना खेळून प्रत्युत्तर दिले आहे. 
- ऑलराउंडर असला तरीही तो आपल्या टेक्नीकमुळे एक चांगला ओपनर फलंदाज म्हणून गाजू शकतो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 

आणखी फोटोज पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...