आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाफ्रिकेचा अाॅस्ट्रेलियाला दणका! सामनावीर गाेलंदाज रबाडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्थ - जबरदस्त फाॅर्मात असलेल्या पाहुण्या दक्षिण अाफ्रिका संघाने साेमवारी यजमान अाॅस्ट्रेलियाविरुद्ध कसाेटी मालिकेत शानदार विजयी सलामी दिली. अाफ्रिकेने सलामीच्या कसाेटीत यजमानांना १७७ धावांनी पराभूत केले. सामनावीर गाेलंदाज रबाडाच्या (५/९२) शानदार कामगिरीच्या बळावर अाफ्रिकेने कसाेटी सामना जिंकला. वाकाच्या (वेस्टर्न अाॅस्ट्रेलिया क्रिकेट असाेसिएशन) मैदानावर अाफ्रिका संघाचा हा तिसरा विजय ठरला. यापूर्वी, अाफ्रिकेने २००८ अाणि २०१२ मध्ये वाकाच्या मैदानावर विजयाची नाेंद केली हाेती.

यासह अाफ्रिका संघाने तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी मिळवली. येत्या १२ नाेव्हेंबरपासून मालिकेतील दुसऱ्या कसाेटीला हाेबार्टच्या मैदानावर सुरुवात हाेईल.
खडतर अाव्हानाचा पाठलाग करणाऱ्या अाॅस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर११९.१ षटकात ३६१ धावांमध्ये गाशा गुंडाळावा लागला. अाफ्रिका संघाने चाैथ्या दिवशी ८ गड्यांच्या माेबदल्यात ५४० धावांचा डाेंगर रचला.

रबाडा चमकला
पाहुण्या दक्षिण अाफ्रिका टीमचा गाेलंदाज रबाडा चमकला. त्याने सलामीच्या कसाेटीत एकूण ७ विकेट घेतली. यात त्याने पहिल्या डावात २ व दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या. यामुळे ताे सामनावीर ठरला.

संक्षिप्त धावफलक
दक्षिण अाफ्रिका : पहिला डाव : २४२, दुसरा डाव : ८ बाद ५४० (डाव घाेषित), अाॅस्ट्रेलिया : पहिला डाव : २४४ धावा, दुसरा डाव : ३६१ धावा (११९.१ षटक)

२८ वर्षांनंतर झाला सलामीला पराभव
तब्बल २८ वर्षांनंतर यजमान अाॅस्ट्रेलिया संघाने घरच्या मैदानावरील कसाेटी मालिकेत सलामीचा पराभवाचा सामना केला अाहे. यापूर्वी, १९८८ मध्ये वेस्ट इंडीज संघाने यजमान अाॅस्ट्रेलियाला गाबामध्ये पराभूत केले हाेते. त्यानंतर अाता अाॅस्ट्रेलियाने अाफ्रिकेविरुद्धचा सलामीचा कसाेटी सामना गमावला.
बातम्या आणखी आहेत...