आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट म्हणाला, अनुष्कासोबतच्या नात्याची माहिती सर्वात आधी जहीरला सांगितली; तो म्हणाला- नाते लपवायचे नसते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतच्या नातेसंबंधांवर मन मोकळे केले. अनुष्काच्या भेटीनंतर एक चांगला माणूस होऊ शकलो, असे तो म्हणाला. अनुष्कासोबतच्या नातेसंबंधांबाबत सर्वात आधी जहीर खानला माहिती दिल्यावर जहीरने त्या वेळी दिलेला सल्ला बहुमोल मानतो, अशी भावना विराटने व्यक्त केली.
 
जहीर विराटला म्हणाला होता, आपले नाते कधी लपवण्याचा प्रयत्न करू नकोस. तू प्रेमात पडलास, काही चुकीचे काम करत नाहीस. अनुष्काच्या सल्ल्यानुसारच सोशल मीडियापासून लांब राहत असल्याचे सांगत विराट म्हणाला, सोशल मीडियावर पाेस्ट टाकायची असेल तर टाक, मात्र त्यावरील प्रतिक्रिया वाचू नकोस, असे तिने सांगितले. गौरव कपूर यांनी घेतलेल्या मुलाखतीत विराट ड्रेसिंगरूममधील खेळीमेळीचे वातावरण, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबतच्या संबंधांवर मोकळेपणाने बोलला. विराट म्हणाला, माझा माहीभाईवर पूर्ण विश्वास आहे. मैदानावर तो धाव घेण्यासाठी खुणावतो तेव्हा मी चेंडूकडे पाहता धावत राहतो. मी क्रिकेटच्या मैदानावर त्याच्यासारखा जीनियस पाहिला नाही. तो उत्कृष्ट क्रिकेटिंग ब्रेन आहे. मी कर्णधार झालो तेव्हा लोकांना वाटले, अामचे पटणार नाही. मात्र, आमच्यात खूप चांगला ताळमेळ आहे.
 
गौरव कपूरला दिलेल्या मुलाखतीत त्याने अनुष्कासोबतचे नातेसंबंध, ड्रेसिंगरूमचे वातावरण कर्णधार म्हणून आलेले अनुभव शेअर केले. भारतीय कर्णधार स्टार फलंदाजाच्या दबावाबाबत विराट म्हणाला, संघ जिंकला पाहिजे एवढाच विचार मी करतो. धावा काढायच्या आहेत आणि क्षेत्ररक्षणात झोकून द्यायचे आहे एवढेच पाहतो.
 
केवळ हार्दिकच्या आयपॅडमध्ये इंग्रजी गाणी सापडतील
विराटने सांगितले की, टीम इंडियामध्ये रोहित शर्मा सर्वात विसरभोळा आहे. तो अनेकदा विमानात, हॉटेलमध्ये आयपॅड, अन्य वस्तू विसरतो. अष्टपैलू हार्दिक पांड्याबाबत तो म्हणाला, बहुतांश खेळाडूंच्या आयपॅडमध्ये पंजाबी गाणी सापडतील. मीही पंजाबी गाणे ऐकतो. केवळ हार्दिक पांड्याच्या आयपॅडमध्ये इंग्रजी गाणी मिळतील. गाण्यातील काही शब्दच त्याला कळत असतील, केवळ धूनवरच तो थिरकत असतो.
 
बातम्या आणखी आहेत...