आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs BAN : प्रतिष्ठा पणाला, 18 वर्षांतील मोठ्या पराभवाची भीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन वेळा विश्वविजेता बनलेल्या भारतीय क्रिकेट संघाला गेल्या १८ वर्षांत प्रथमच क्लीन स्वीप मिळण्याची भीती आहे. भारतीय टीम बांगलादेशात सुरू असलेल्या तीन वन डे सामन्यांच्या सिरीजमध्ये पहिल्या दोन मॅच गमावून ०-2 ने पिछाडीवर आहे. बांगलादेश विरोधात भारताने प्रथमच वन डे सिरीज गमावली आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान तिसरा वन डे सामना बुधवारी होत आहे. 0-3 अशी क्लीन स्वीप मिळू नये म्हणून भारताला कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावा लागेल.

1997 मध्ये श्रीलंकेकडून मिळाली होती क्लीन स्वीप
भारतीय उपखंडात टीम इंडियावर यापूर्वी 1997 मध्ये क्लीन स्वीपची नामुष्की आली होती. त्यावेळी श्रीलंकेत भारताचा 3-0 ने पराभव झाला होता. त्यानंतर भारताला आतापर्यंत पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये कधही वनडे मालिकेत क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले नाही. वनडेच्या इतिहासात बांगलादेशकडून भारताला 31 पैकी केवळ 5 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे.

आशियामध्ये भारताची कामगिरी
1989-90 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर 2-0 ने मालिका गमावली.
1997-98 मध्ये पाकिस्तान दौऱ्यात मालिका 1-2 ने गमावली.
भारतात 2003-04 मध्ये पाकिस्तान विरोधात 3-2 ने मालिका जिंकली.
2004-05 मध्ये बांगलादेशात 2-1 ने मालिका जिंकली.
2005-06 मध्ये पाकिस्तानात 4-1 ने मालिका जिंकली.
2006 मध्ये श्रीलंका दौऱ्यात मालिका अनिर्णित राहिली.
2007 मध्ये बांगलादेशात 2-0 ने मालिका जिंकली.
2008 मध्ये श्रीलंका दौऱ्यात 3-2 ने मालिका जिंकली.
2008-09 मध्ये श्रीलंकेत 4-1 ने मालिका जिंकली.
2012 मध्ये पुन्हा श्रीलंकेत 4-1 ने मालिका जिंकली.
2014 मध्ये बांग्लादेशला 2-0 ने पराभूत केले.
बातम्या आणखी आहेत...