कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी आज आपला 27 वा वाढदिवस साजरा करीत आहे. तिचा जन्म 19 नोव्हेंबर, 1988 मध्ये गुवाहाटी येथे झाला होता. धोनी आणि साक्षी एकाच शाळेत शिकत होते. दोघेही लहानपणी मित्र होते. मात्र दोघांच्याही वयात खूप अंतर आहे. धोनीपेक्षा साक्षी 7 वर्षांनी लहान आहे.
वयात अंतर मात्र नात मजबूतच :
वयात बरेच अंतर असूनही धोनी आणि साक्षीच नात मजबूत आहे. साक्षी आता 27 वर्षांची झाली आहे, तर धोनी 34. धोनीचा जन्म 7 जुलै, 1981 मध्ये झाला आहे. दोघांच्या विवाहाला 5 वर्षे पूर्ण झाले आहे. या जोडप्याला आता जिवा नावाची एक मुलगीही आहे. जिवाचा जन्म 6 फेब्रूवारी, 2015 मध्ये झाला.
क्रिकेट विश्वात अशी अनेक जोडपे आहेत ज्यांच्यात वयाचे बरेच आहे. यात सचिन-अंजली, शिखर धवन-आयशा मुखर्जी यासह पाकिस्तानी आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचाही समावेश आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा क्रिकेट विश्वातील काही अशाच जोडप्यांविषयी ज्यांच्या वयात बराच अंतर आहे...