आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रहाणे टीम इंडियाचा कॅप्टन, झिम्बाब्वे दौऱ्यात वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड झाली आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने नियमित कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, शिखर धवन यांना विश्रांती दिली आहे. महेंद्रसिंग धोनी आणि कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे भारताचे नेतृत्व देण्यात आले आहे.
भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन वनडे आणि दोन टी-२० सामने खेळेल. या वेळी निवड समितीने भारतीय-अ संघाचीही निवड केली. भारतीय अ संघाला १९ जुलैपासून चेन्नई आणि वायनाड येथे ऑस्ट्रेलिया-अ आणि द. आफ्रिका-अ संघासेाबत तिरंगी वनडे मालिका खेळायची आहे. निवड समितीच्या बैठकीत समितीचे प्रमुख संदीप पाटील, रॉजर बिन्नी, विक्रम राठोड, साबा करीम आणि बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर उपस्थित होते.

यांना मिळाली विश्रांती
महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, शिखर धवन, उमेश यादव, आर. अश्विन, रवींद्र जडेजा यांना झिम्बाब्वे टूरसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

खेळाडूंनी केली होती विश्रांतीची मागणी : पाटील
खेळाडू स्वत:हून आम्हाला विश्रांती देण्यासंबंधी विनंती करीत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांना विश्रांती देत नाही. बांगलादेश दौऱ्याच्या वेळी खेळाडूंनी आम्हाला विनंती केली नव्हती. त्यामुळे बांगलादेशला आम्ही पूर्ण ताकदीनिशी संघ पाठविला होता. यंदा आम्हाला विश्रांती हवी, अशी विनंती धोनी, कोहली, रोहित, रैना, अश्विन, शिखर धवन व उमेश यादव या खेळाडूंनी केली होती. त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य खेळाडूंची निवड करून संघ निवडण्यात आल्याची माहिती निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली.
कोणाची काय भूमिका असेल
फलंदाज : अजिंक्य रहाणे, मुरली विजय, अंबाती रायडू, मनोज तिवारी, मनीष पांडे.
अष्टपैलू : स्टुअर्ट बिन्नी.
यष्टिरक्षक : रॉबिन उथप्पा.
फिरकीपटू : हरभजनसिंग, अक्षर पटेल, कर्ण शर्मा.
वेगवान गोलंदाज : धवल कुलकर्णी, भुवनेश्वरकुमार, मोहित शर्मा, संदीप शर्मा.

भारतीय संघ असा
अजिंक्य रहाणे (कर्णधार), मुरली विजय, अंबाती रायडू, मनोज तिवारी, केदार जाधव, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, हरभजनसिंग, अक्षर पटेल, धवल कुलकर्णी, कर्ण शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वरकुमार, मोहित शर्मा, संदीप शर्मा.

भारतीय अ संघ
चेतेश्वर पुजारा (कर्णधार), लोकेश राहुल, अभिनव मुकुंद, करुण नायर, श्रेयस अय्यर, नमन ओझा, अमित मिश्रा, विजय शंकर, प्रज्ञान अोझा, शार्दूल ठाकूर, वरुण अॅरोन, मिथुन मिन्हास, गोपाल, बाबा अपराजित.

झिम्बाब्वे दौऱ्याचा कार्यक्रम असा
१० जुलै : पहिला वनडे सामना
१२ जुलै : दुसरा वनडे सामना
१४ जुलै : तिसरा वनडे सामना

टी-२० मालिका
१७ जुलै : पहिला सामना
१९ जुलै : दुसरा सामना

^एकूण ही टीम चांगली आहे. बॅलन्स आहे. संघात युवा खेळाडूंची संख्या अधिक आहे. भारताला वेगवान गोलंदाजांची संख्या वाढवता आली असती.
- मनोज प्रभाकर.
बातम्या आणखी आहेत...