आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Wadekar Recalls Memories About Sachin Tendulkar

सचिन अपघाताने सलामीवीर, वाडेकरांनी सचिनच्या आठवणीस दिला उजाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - १९९४ च्या न्यूझीलंड दौऱ्यात भारताचा सलामीवीर नवज्योतसिंग सिद्धू याच्या पायाचा घोटा दुखावला. त्या अपघाताने भारताला नवा सलामीवीर मिळाला, ज्याने त्यानंतरची २० वर्षे भारतासाठी सलामीची समस्या जाणवू दिली नाही. तो खेळाडू होता सचिन तेंडुलकर!
भारताचे माजी कप्तान अजित वाडेकर यांनी मुंबईतील एका समारंभात सचिनबाबतच्या काही मिश्कील आठवणीही सांगितल्या. त्याच दौऱ्यात छोट्या सचिनने आपल्या वाढदिवसाला अर्धा डझन बेली डान्सर्स पाठवून कशी धमाल उडवून दिली होती, तो किस्साही सांगितला. सचिनच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या लीजंड्स ग्रुपच्या आपल्या व्याख्यानात वाडेकर यांनी सचिन अपघाताने कसा सलामीवीर बनला व कायम राहिला, ते सांगितले. ईडन पार्क, ऑकलंड या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामना रंगला होता.

सचिनने केले एप्रिल फुल
१ एप्रिल राेजी सचिनने एप्रिल फुल केले. त्याने रात्री दरवाजा ठोठावला. त्याच्या चेहऱ्यावर काळजीच्या छटा दिसत होत्या. मी सचिनला विचारले, काय झाले? तो म्हणाला, ‘कपिलदेवची तब्येत ठीक नाही.' मी लगेच कपिलच्या रूममध्ये गेलो. रूममध्ये संपूर्ण केक आणि शॅम्पेनच्या बाटलीसह उभा होता. त्यापेक्षा मोठा धक्का दुसऱ्या रूममधून सहा बेली डान्सर्स आल्या आणि नाचायला लागल्या.