आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ANALYSIS दोघांच्या वादात तिसरा कर्णधार, नवा प्रयोग की पर्याय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांगलादेशात पराभवानंतर टीम इंडिया ३ वनडे, २ टी-२० सामने खेळण्यासाठी १० जुलैला झिम्बाव्वे दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, बाेर्डाने अर्ध्या संघाला आराम देऊन बाहेर बसवलेल्या अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व सोपवले. सचिन तेंडुलकरनंतर १५ वर्षांनी महाराष्ट्राला कर्णधारपद मिळाले आहे. १९९६ मध्ये पहिल्यांदा कर्णधार बनलेला सचिन २००० मध्ये या जबाबदारीतून मुक्त झाला होता. धोनी निवृत्तीच्या मार्गावर आहे. कोहलीशी त्याचे पटत नाही. या वादात तिसऱ्यालाच कर्णधार करून बोर्डाने नवा पर्याय तर आणला नाही?
असे म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते. कधी संशय तर कधी योगायोगातून. सोमवारी भारतीय क्रिकेटचे कर्तेधर्ते संघ निवडीसाठी बसले. तास-दीड तास बैठक चालली. पहिल्यापासून शेवटपर्यंतची सर्व नावे चकित करणारी होती. अजिंक्य रहाणेला कॅप्टन बनवले. ४ वर्षांपासून वनवासात असलेल्या हरभजनसह मुरली विजय, रायडू, उथप्पा, बिन्नी संघात परतले. मात्र, घेतलेल्यांपेक्षा काढलेल्या नावांनीच चकित केले. संघात धोनी, विराट, रैना, धवन आणि अश्विन नाहीत. तब्बल आठ वरिष्ठ खेळाडूंना आराम देऊन बोर्डाने रहाणेवर धुरा सोपवली.
छोट्या देशांच्या दौऱ्यात मोठ्या खेळाडूंना आराम दिला जातोच. पण अर्ध्यापेक्षा जास्त संघाला बसवण्याची ही बहुधा पहिलीच वेळ. आता थोडे भूतकाळात जाऊयात. २००७ मध्ये टीम इंडियात सचिन, सौरव, द्रविड, लक्ष्मण, सेहवागसारखे धुरंधर होते. तेव्हा द. आफ्रिकेत टी-२० वर्ल्डकप होणार होता. मात्र, मोठ्या खेळाडूंनी आरामाची मागणी केली. कुणाला ना कुणाला तर पाठवावे लागणारच होते. बोर्डाने नवख्या धोनीला थेट कॅप्टन म्हणून पाठवले. सेहवाग हा दावेदार होता, मात्र गांगुलीची पसंती धोनीला होती. झालेही तसेच. सेहवाग संघात राहिला पण कर्णधार बनू शकला नाही. हाच धाेनी पुढे टीम इंडियाचा सर्वात मोठा चेहरा बनला.
सर्व बडे खेळाडू नेपथ्यापुरतेच राहीले अन् धोनी सर्वोच्च स्थानी बसला. आज सौरवच्या जागी धोनी आणि सेहवागच्या स्थानी विराट कोहली आहे. धोनी-कोहलीत वितुष्टाच्या बातम्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. सोमवारी त्याला पूर्णविराम मिळाला. आरामाच्या नावाखाली कोहली बाहेर बसला वा बसवला गेला. तेव्हाही टॉप ५ खेळाडू गेले नव्हते, आताही तशीच पुनरावृत्ती झाली आहे. आणखी एक योगायोग पहा. २००७ मध्ये धोनी कर्णधार बनून टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी गेला होता तेव्हा संघाला कोणताही प्रशिक्षक नव्हता. लालचंद राजपूत हे कामचलावू प्रशिक्षक होते. आता संघ झिम्बाॅव्बेला जात असला तरी दौऱ्यात टीम डायरेक्टर रवी शास्त्री नसतील.

रहाणे सक्षम तर आहे...
रहाणेने गेल्या वर्षभरात २५ वनडेत २ शतकांसह ८३९ धावा केल्या आहेत. या कालावधीत तीन कसोटी शतकेही झळकावली. तीही परदेशी खेळपट्ट्यांवर. उलट गेल्या १० डावांत विराटला एक अर्धशतकही ठोकता अालेले नाही.

नवीन संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), मुरली विजय, रायडू, मनोज तिवारी, केदार जाधव, उथप्पा , मनीष पांडे, हरभजन, अक्षर पटेल, कर्ण शर्मा, धवल कुलकर्णी, बिन्नी, भुवनेश्वर, मोहित शर्मा आणि संदीप शर्मा.
पुढील स्लाइड्सवर वाचा, का मिळाले राहणेला नेतृत्व...
बातम्या आणखी आहेत...