आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिस गेल बनला आहे टी-२० चा सुपरबॉस! (अयाज मेमन)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टी-२० वर्ल्डकप क्रिकेटचा रोमांच पहिल्या आठवड्यात शिखरावर पोहोचला आहे. आतापर्यंत तीन घटनांनी मी प्रभावित झालो. १. क्रिस गेलची तुफानी खेळी. २. इंग्लंडचा धावांचा पाठलाग करून विजय. ३. दमदार प्रदर्शन करून न्यूझीलंडचा दोन सामन्यांत विजय. पाचदिवसीय कसोटीत दोन त्रिशतके ठोकणारा गेल टी-२० चा सुपरबॉस ठरला आहे. इंग्लंडविरुद्ध अवघ्या ४७ चेंडूंत नाबाद शतक ठोकून त्याने दणका दिला. विरोधी संघाचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांत दहशत माजवण्यात आपण सर्वात पुढे असल्याचे गेलने सिद्ध केले आहे. या छोट्या स्वरूपात गेल आणि इतर दिग्गजांत फरक आहे. गेलची तुलना फक्त सर व्हिव्हियन रिचर्ड््स यांच्याशी होत आहे. गेलने जी खेळी केली ती आंतरराष्ट्रीय खेळी कमी आणि एक "तमाशा शो'च अधिक वाटत आहे. गेल षटकार ठोकत होता आणि खेळाडू, क्षेत्ररक्षक, चाहते बघत होते. गेलची ही आतापर्यंतची सर्वाधिक स्फोटक खेळी आहे, असे कोच फिल सिमन्स यांनी म्हटले. सिमन्स म्हणाले, "गेल गोलंदाज आणि विरोधी संघांच्या मनात भीती निर्माण करतो, धडकी भरवतो. वेस्ट इंडजीचा क्रिस गेल नि:संकोचपणे टी-२० चा सुपरबॉस आहे.'
टी-२० वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडचा फिरकीपटू सँटनरने जबरदस्त प्रभावित केले. सँटनरने भारताविरुद्ध ११ धावांत ४ विकेट आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ गडी बाद केले. तो युवा, शिकाऊ आणि वेगाने प्रगती करणारा खेळाडू आहे. भारतातील खेळपट्टी बघून सँटनरला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आले. त्याने दोन सामन्यांत ६ विकेट घेऊन संघातील आपली जागा पक्की केली आहे. टी-२० च्या माध्यमातून एका नव्या ताऱ्याचा उदय झाला आहे. इंग्लंडने द. आफ्रिकेविरुद्ध विजयासाठी गरज असलेले २३० धावांचे कठीण लक्ष्य गाठल्यानंतर मी टी-२० वर्ल्डकपमध्ये तिसऱ्यांदा रोमांचित झालो. इंग्लंडचा मधल्या फळीचा फलंदाज जो. रुटने (८३) कमाल कामगिरी केली. रुटने धाडस आणि विजयासाठी गरज असलेली भूक दाखवताना जबरदस्त फलंदाजी केली. द. आफ्रिकेने शानदार फलंदाजी केली होती. मात्र, दुर्दैवाने ते चोकर्सच्या मानसिकतेतून बाहेर येऊ शकले नाहीत. स्पर्धेत न्यूझीलंडने आतापर्यंत सर्वात चांगले प्रदर्शन केले आहे. न्यूझीलंडने भारत आणि ऑस्ट्रेलियाला हरवले. भारत, आॅस्ट्रेलिया किताबाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. अशात टी-२० मध्ये कोणालाही संभाव्य दावेदार ठरवणे चुकीचे आहे हे न्यूझीलंडने सिद्ध केले. न्यूझीलंडने दोन्ही कमी स्कोअरचे सामने जिंकले यामुळे त्यांची स्तुती झालीच पाहिजे. विशेष म्हणजे न्यूझीलंडने त्यांचे दोन सर्वाधिक यशस्वी गोलंदाज टीम साउथी आणि ट्रेंट बोल्ट यांना संघाबाहेर ठेवून विजय मिळवला. दोन्ही सामन्यांत त्यांनी युवा फिरकीपटूंना आजमावले. त्यांची रणनीती यशस्वी ठरली. युवा केन विल्यम्सनने शानदार नेतृत्व केले. त्याची स्तुती करावी तेवढी कमीच आहे. ब्रेंडन मॅक्लुमची उणीव त्याने जाणवू दिली नाही. आतापर्यंतच्या प्रदर्शनाच्या आधारे न्यूझीलंडचा सेमीफायनल प्रवेश निश्चित आहे. मी तर न्यूझीलंडला संभाव्य विजेता समजतो.