आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयचा स्थानिक स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -येत्या ऑक्टोबर ते मार्च महिने या ६ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ९०० सामने आयोजित करण्याची महायोजना बीसीसीआयने नवनिर्वाचित सचिव अनुराग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आखली आहे. पुढील वर्षी आयसीसी विश्वचषक ट्वेन्टी-२० च्या आयोजनाआधी तब्बल २१०० ‘फ्लेइंग डेज’ची महत्त्वाकांक्षी योजना बीसीसीआयने आखली असून भारताच्या सर्व प्रमुख खेळाडूंना स्थानिक क्रिकेटच्या प्रवाहात यंदा सामील करून घेण्याची ही कल्पना आहे.
सचिव अनुराग ठाकूर यासंदर्भात माहिती देताना म्हणाले, ‘यंदाच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांची आम्ही अशी रचना केली आहे, की सर्व आंतरराष्ट्रीय मालिकांच्या वेळी या सामन्यांच्या तारखांचा संघर्ष होणार नाही, त्यामुळे सर्वच खेळाडूंना स्थानिक क्रिकेटमध्ये सहभागी होता येईल व आपले कौशल्य, फॉर्म दाखविता येईल. त्यामुळे सर्वच खेळाडूंसाठी राष्ट्रीय संघातील प्रवेशाचे दरवाजे खुले राहतील.’

त्याकरिता बीसीसीआयने पुढील हंगामाचा कार्यक्रम आधीच जाहीर केला असून सर्व राज्य व संलग्न संस्थांना हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आणि योजना आखण्यासाठी पुरेसा वेळ दिला आहे, असेही अनुराग ठाकूर पुढे म्हणाले. खेळाडूंची उपलब्धता, नैसर्गिक परिस्थितीचे आव्हान यामुळे या कार्यक्रमाला कसा प्रतिसाद मिळेल याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.

हे आहे वैशिष्ट्य
- १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंचा विश्वचषक व ट्वंेटी-२० विश्वचषक स्पर्धा समोर ठेवून आखणी.
- उत्तर भारतातील डिसेंबर-जानेवारीच्या नैसर्गिक आव्हानाचा विचार.
- यंदापासून १९ वर्षांखालील खेळाडूंसाठी चॅलेंजर स्पर्धेचे आयोजन, ३ संघांची समितीतर्फे निवड.
- विजय हजारे स्पर्धेचा विजेता व अन्य २ संघांत यंदा देवधर करंडक स्पर्धा.
- महिलांसाठी २३ वर्षांखालील व आंतरविभागीय या २ स्पर्धांचे आयोजन.
बातम्या आणखी आहेत...