आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५०० कसोटी खेळणाऱ्या क्लबमध्ये सामील होणार, १९३२ मध्ये भारताने पहिला कसोटी खेळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताने ८४ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत ४९९ कसोटी सामने खेळले आहेत. २२ डिसेंबर न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतील पहिल्या कसोटीत खेळताना टीम इंडिया ५०० कसोटी खेळणाऱ्या एलिट क्लबमध्ये सामील होईल.

इंग्लंडने सर्वाधिक ९७६ कसोटी खेळले. ऑस्ट्रेलिया ७९१ कसोटींसह दुसऱ्या, तर वेस्ट इंडीज ५१७ कसोटींसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने आतापर्यंत ४९९ कसाेटी सामने खेळले असून यात १२९ जिंकले आणि १५७ मध्ये हार स्वीकारली आहे. एक सामना टाय झाला, तर २१२ सामने ड्रॉ झाले. न्यूझीलंडविरुद्ध ५४ कसोटीत भारताने १८ मध्ये विजय मिळवला, १० गमावले तर २६ सामने ड्राॅ केले आहे. भारताने सर्वाधिक ४३ विजय इंग्लंडविरुद्ध मिळवले आहेत.
१९५५ मध्ये सुरुवात
भारत आणि न्यूझीलंड कसोटी संबंधांना १९५५ पासून सुरुवात झाली. न्यूझीलंडने अखेरीस २०१२ मध्ये भारताचा दौरा केला होता. त्या वेळी भारताने दोन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली होती. न्यूझीलंडचा हा अकरावा भारत दौरा आहे. भारताने २०१३-१४ मध्ये न्यूझीलंडचा दौरा केला होता. तेव्हा भारताने दोन सामन्यांची मालिका १-० ने गमावली होती. न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून टीम इंडिया पुन्हा कसोटीत नंबर वन बनण्याच्या प्रयत्नात असेल.
बातम्या आणखी आहेत...