आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काय धोनीला \'इशारा\' देण्यासाठी BCCIने अश्विनला केले पुढे? ये तो क्रिकेट नहीं!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- रांची आणि क्रिकेटचा उल्लेख झाला की सर्वप्रथम मनात नाव पुढे येते ते भारतीय संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे. क्रीडा विश्वात अशी चर्चा आहे की, बीसीसीआयने धोनीला 'खालचा' दाखवण्यासाठी अशा क्रिकेटरला निवडले आहे ज्याच्याशी त्याचे मागील काही दिवसापासून बिनसले असल्याची अफवा होती. न्यूझीलंड दौ-याचे वेळापत्रक जाहीर करताना धोनीसोबत जे काही घडले ते इतरांना दिसले नसेल पण धोनीला याचे दु:ख जरूर वाटले असेल.
बीसीसीआयने असा दिला धोनीला धक्का...
- बीसीसीआयने न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेसाठी स्पर्धेचे वेळापत्रक प्रथम ट्विटरद्वारे जाहीर केले.
- कोहलीने या दौ-याबाबत ट्विट केले तर अजिंक्य रहाणेने मुंबईच्या व इंदूर (मराठी) कनेक्शनच्या कारणामुळे इंदूरमधील सामन्याबाबत माहिती दिली.
- तर, शिखर धवनने आपले शहर दिल्लीतील सामन्याबाबत टि्वट करून माहिती दिली.
- रांचीत होणा-या सामन्याबाबत खरं तर धोनीने टि्वट करणे अपेक्षित होते मात्र बीसीसीआयने धोनीऐवजी आर. अश्विनला टि्वट करायला लावले.
कधी काळी धोनीच्या गोटातील होता अश्विन...
- आर. अश्विन आणि धोनी कधी काळी खूप जवळचे होते.
- धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून अश्विन सलग 8 वर्षे खेळला. त्यानंतर आयपीएलच्या नवव्या मोसमात धोनी व अश्विन पुणे संघातून खेळताना दिसले.
का पडले अंतर
- जानेवारी 2016 मध्ये ऑस्ट्रेलिया दौ-यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात जडेजा आणि अश्विनने 18 षटकात 129 धावा दिल्या होत्या.
- यात अश्विनने 10 षटकात 68 धावा देत दो विकेट घेतल्या तर जडेजाने 8 षटकात 61 धावा दिल्या.
- त्यानंतर दुस-या एकदिवसीय सामन्यात अश्विनने 10 षटकात 60 धावा दिल्या मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही.
- यानंतर झालेल्या तिस-या, चौथ्या आणि पाचव्या सामन्यात धोनीने अश्विनला संघात स्थान दिले नाही.
- तसेच पत्रकार परिषदेत अश्विनला कामगिरी सुधारण्याची गरज असल्याचा सल्ला दिला होता.
पुढील स्लाईड्सद्वारे जानून घ्या, कोणत्या भारतीय खेळाडूंनी न्यूझीलंड दौ-याबाबत काय केले ट्वीट, सोबतच धोनी ट्वीट करणा-यात आहे की नाही...
बातम्या आणखी आहेत...