आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhuwaneshwari Married Sreesanth Even After Spot Fixing Allegations

PHOTOS: जगाने धुडकावले, पण हिने स्वीकारले, क्रिकेटर श्रीसंतसोबत थाटले लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीच्या एका न्यायालयाने इंडियन प्रिमियर लीगमधील (आयपीएल-2013) स्पॉट फिक्सिंग प्रकरणी खेळाडू शांतकुमारन श्रीसंत, अजीत चंदिला आणि अंकित चव्हाण यांना दोषमुक्त केले आहे. न्यायालयाच्या निर्णयाने दिल्ली पोलिसांना जोरदार झटका बसला आहे. पोलिसांनी न्यायालयासमोर 6000 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यात 42 जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंनी पोलिसांनी अटक केली होती.
फिक्सिंगमध्ये अडकल्यानंतर केले लग्न
मे 2013 मध्ये श्रीसंत फिक्सिंग प्रकरणात अडकला होता. यावेळी तो लग्नाचा विचार करत होता. या प्रकरणात नाव आल्यावर जवळपास सर्वांनीच त्याला दोषी ठरवले. पण भुवनेश्वरी नावाच्या युवतीचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. 12 डिसेंबर 2013 रोजी तिने त्याच्यासोबत लग्न केले. कोचीच्या ले मेरिडियनमध्ये हे लग्न झाले. त्याच्या लग्नात कोणताच क्रिकेटपटू आला नव्हता.
6 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते
श्रीसंत आणि भुवनेश्वरी सहा वर्षांपासून एकमेकांना ओळखायचे. ओळखीचे रुपांतर प्रेमात आणि प्रेमाचे लग्नात झाले. आता दोघांना एक मुलगीही आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटो....