न्युयॉर्क (अमेरिका)- तुम्ही जंक फुड आणि एनर्जी ड्रिंकचे शौकीन असाल तर ही बातमी तुम्हाला धक्का देणारी आहे. अगदी तंदुरुस्त दिसणारा 39 वर्षांचा बॉडी बिल्डर डीन वारंबी केवळ 8 महिन्यात मृत्युमुखी पडला. प्रकृती खराब होण्याला जंक फुड आणि एनर्जी ड्रींक जबाबदार असल्याचे सांगितल्यावर ग्रेटर मॅनचेस्टरचा डीन वारंबी चर्चेत आला होता. मृत्युशी झुंज देत असताना नुकताच त्याचा लिव्हर कॅन्सरने मृत्यू झाला. अखेरच्या समयी पार्टनर चारलेट आणि मुलगी स्कॉरलेट त्याच्याजवळ होत्या.
नोव्हेंबरपासून मृत्युशी संघर्ष
नोव्हेंबर 2014 मध्ये डॉक्टरांनी त्याला सांगितले, की त्याच्या लिव्हरमध्ये ट्युमर आहे. आता आपल्या हातात काहीच महिने असल्याचे त्याला तेव्हाच लक्षात आले होते. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे असे झाले असे त्याने सांगितले. डॉक्टरांनी आयुष्यातील निश्चित अवधी सांगितला. तेव्हापासून जास्तीत जास्त जगण्यासाठी त्याचा निरंतर संघर्ष सुरु होता. त्याने नैसर्गिक औषधे आणि व्हिटॅमिनच्या गोळ्यांशिवाय शाकाहारी आणि शुगर फ्री भोजन घेण्यास सुरवात केली.
जंक फुड आणि एनर्जी ड्रिंकने होऊ शकतो कॅन्सर
जिममध्ये व्यायाम करायला जायचा तेव्हा तो बर्गर, पिझ्झा, सॅंडविच यांसह 7 ते 8 बॉटल एनर्जी ड्र्रींक सेवन करुन जायचा. तो दररोज दहा हजार कॅलरीज शरीरात घ्यायचा. कॅन्सर झाल्याचे समजल्यावर त्याने जंक फूडच याला जबाबदार असल्याचे सांगितले. लोकांनी असा आहार ठेवू नये असे त्याने सांगितले. अखेर दिवसांमध्ये तो प्रत्येक दिवशी फेसबुकवर पोस्ट टाकत होता. जंक फुडचे तोटे लोकांपर्यंत पोहोचावेत असा त्याचा उद्देश होता. त्याचे फेसबुकवर 10 हजारांपेक्षा जास्त फॅन्स आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, डीन वारंबी याचे वेगवेगळे फोटो... असा करायचा जीममध्ये वर्कआऊट...