आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इतकाही Cool नव्हता Captain धोनी, कॅमेरा बंद होताच असा झापायचा; रैनाचा खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - इंडियन टीमचा Captain Cool म्हणूनही ओळखल्या जाणारा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी प्रत्यक्षात तेवढाही कूल नव्हता असा खुलासा सुरेश रैनाने केला आहे. कॅप्टन कूलला देखील राग यायचा, पण त्याचा राग व्यक्त करण्याची पद्धत वेगळी होती. स्पोर्ट्स अँकर गौरव कपूरच्या एका शोमध्ये रैनाने हा खुलासा केला आहे. यात रैनाने धोनीशी निगडीत मॅचचे काही खास मोमेंट देखील शेअर केले आहेत. 

 

कॅमरा बंद होताच असा झापायचा...
> "धोनीचा चेहरा पाहून कधीच अंदाज येत नाही, की त्याच्या मनात काय चालत असेल. अनेकवेळा त्याला राग आला तरीही तो व्यक्त करत नव्हता."
> "ओव्हर समाप्त होताच कॅमेरे बंद होतात. आणि टीव्हीवर अॅड ब्रेक लागतो. त्याचवेळी धोनी रागात समोरच्या खेळाडूला 'सुधर रे' असे म्हणत आपला राग काढायचा."
> उल्लेखनीय बाब म्हणजे, रैना आणि धोनी फील्डवर जसे दिसतात तसेच फील्डच्या बाहेर देखील ते खूप चांगले मित्र आहेत. सलग 8 वर्षे या दोघांनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स या एकाच टीममध्ये खेळले आहे. 
> धोनीने जानेवारी 2017 मध्येच टीम इंडियाची वनडे आणि टी-20 कॅप्टनशिप सोडली आहे. तसेच टीम इंडियातून बाहेर असलेला रैना सध्या रणजी ट्रॉफी खेळत आहे.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, जेव्हा धोनी म्हणाला, 'और दे साले को'

बातम्या आणखी आहेत...