आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स लीगला टी-२० चा पर्याय?, अायपीएल संचालन समितीची बुधवारी बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - येत्या ८ जुलै राेजी इंडियन प्रीमियर लीगच्या संचालन समितीची बैठक हाेणार अाहे. या बैठकीत चॅम्पियन्स लीगच्या जागी अाता टी-२० स्पर्धेच्या अायाेजनाच्या पर्यायावर शिक्कामाेर्तब हाेण्याची शक्यता अाहे. मात्र, चॅम्पियन्स लीगला पूर्णपणे बंद करण्यात अालेले नाही. भारत, अाॅस्ट्रेलिया अाणि दक्षिण अाफ्रिकेच्या क्रिकेट मंडळांच्या संचालन समितीने विविध देशांच्या देशांतर्गत टी-२० चॅम्पियन क्लबमध्ये हाेणाऱ्या चॅम्पियन लीग स्पर्धेला बंद करण्यास हाेकार दिला अाहे.
चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धा इतिहासजमा झाली. त्यामुळे भविष्यात नावीन्याची गरज अाहे, अशी माहिती बीसीसीअायच्या सुत्राने दिली.
असे अाहेत पर्याय
१. अायपीएल-२०१५ मधील अव्वल चार टीमसाेबत एक सात सामन्यांच्या मिनी अायपीएल स्पर्धेचे अायाेजन.
२. अायपीएलच्या सर्वच अाठ संघांमध्ये एकूण १५ सामन्यांची एक स्पर्धा अायाेजित करणे.
३. वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाच्या प्रस्तावानुसार भारत अाणि विंडीज यांच्यात एका मालिकेचे अायाेजन करणे.