आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : आजच्याच दिवशी जिंकली होती चॅम्पियन्स ट्रॉफी, असा केला होता जल्लोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डान्स करून आनंद व्यक्त करताना विराट कोहली आणि शिखर धवन. - Divya Marathi
डान्स करून आनंद व्यक्त करताना विराट कोहली आणि शिखर धवन.
बांगलादेशच्या विरोधात वन डे मालिका गमावल्याने भारतीय क्रिकेट संघावर सगळीकडून टीकेचा भडीमार होत आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याच्या आनंदात बुडालेला होता. 23 जून, 2013 रोजी भारताने इंग्लंडला 5 धावांनी पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी टी 20 जिंकण्याचा गौरव मिळवला होता. त्या विजयासह धोनी आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकणारा भारतीय कर्णधार बनला होता. त्याआधी धोनीने 2007 मध्ये टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता.

प्रत्येकजण होता आनंदी
या विजयानंतर भारतीय संघातील खेळाडुंचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. विजयानंतर प्रत्येक भारतीय खेळाडू डान्स करत होता. विराट कोहली, शिखर धवन, सुरेश रैना आणइ रोहित शर्मासह सगळेच जल्लोष साजरा करत होते. 25 चेंडूंमध्ये 33 धावा आणि दोन विकेट घेणारा रवींद्र जडेजा सामनावीर ठरला होता, तर शिखर धवन मालिकावीर.

असा झाला सामना
नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 7 विकेट गमावत 129 धावा केल्या होत्या. विराट कोहली (43), शिखर धवन (31) आणि रवींद्र जडेजा (33) यांनी चांगली खेळी केली होती. तर इंग्लंडच्या रवी बोपाराने 3 विकेट घेतल्या होत्या. प्रत्युत्तरात फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडला 20 षटकांत 8 विकेट गमावत केवळ 124 धावाच करता आल्या होत्या. इयॉन मॉर्गन (33), रवी बोपारा, जॉनाथन ट्रॉट (20) आणि इयान बेल (13) यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली होती. रवींद्र जडेजा, आर. अश्विन आणि इशांत शर्मा सर्वांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या होत्या.

पुढील स्लाइड्सवर पाहा, भारतीय संघाने केलेल्या जल्लोषाचे PHOTO
बातम्या आणखी आहेत...