आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीसीसीआयचा कोच, डायरेक्टर निवडीचा गुंता सुटता सुटेना, गांगुलीला पदांचा अडसर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपून दोन महिने उलटले, तरीही भारतीय क्रिकेट संघाला अद्याप प्रमुख प्रशिक्षक देण्यात बीसीसीआय कार्यकारिणीला यश आलेले नाही.
जगमोहन दालमिया यांच्या पसंतीने सौरव गांगुलीच्या गळ्यात क्रिकेट संचालकपदाची माळ घालण्याचे ठरत असतानाच गांगुलीचे अन्य कंपन्यांशी असलेले करार आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे सचिवपद आड येत आहे. त्यामुळे याआधी रवी शास्त्रीची बांगलादेश दौऱ्यापुरती नियुक्ती करण्याच्या मन:स्थितीत असलेल्या बीसीसीआयने गांगुलीला पर्याय म्हणून शास्त्रीकडे पाहायला सुरुवात केली आहे.

सौरव गांगुलीवर जबाबदारी सोपवण्यात बीसीसीआयला त्याचे नव्या जबाबदारीमुळे होणारे नुकसानही भरून द्यावे लागणार आहे. गांगुलीने समालोचनाबरोबरच अन्य गोष्टींचे करारही इतर कंपन्यांशी केले आहेत.

शास्त्रीचीही तीच समस्या आहे. केवळ बांगलादेश दौऱ्यापुरता करार शास्त्री यांना नको आहे. त्यांना क्रिकेट समालोचनाबाबतची आपली भूमिका टेलिव्हिजन कंपन्यांशीही स्पष्ट करायची आहे. भारतीय संघातील खेळाडूंशी सध्या एकरूप झालेल्या रवी शास्त्री यांना संघातील खेळाडूंची पसंती आहे. मात्र, बीसीसीआयच्या नव्या पदाधिकाऱ्यांची पसंती गांगुलीला आहे. म्हणूनच ७ जूनला बांगलादेश दौऱ्यावर निघण्याआधी संघाच्या प्रशिक्षकाचे व डायरेक्टरचे नाव घोषित करण्यात येईल.

श्रीनिवासन यांच्या राजवटीत चर्चेत असलेली परदेशी प्रशिक्षकांची नावेही सध्या मागे पडली आहेत. हेड कोच कोण असेल या प्रश्नाचे उत्तर जसे बीसीसीआयकडे नाही, तसेच सहप्रशिक्षक संजय बांगर, बी. अरुण, आर. श्रीधर यांनाही आपले भवितव्य ठाऊक नाही. बांगलादेशला जायचे किंवा नाही याबाबतच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत हे प्रशिक्षक व अन्य सपोर्ट स्टाफही सध्या आहे. प्रशिक्षक, डायरेक्टर व अन्य सपोर्ट स्टाफची घोषणा येत्या ६ जूनला होण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...