आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खेळाडू-प्रशिक्षकात संवाद गरजेचा, कपिल देव याने व्यक्त केले मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रशिक्षक कोणत्याही देशाचा असूदे, त्याच्यात आणि प्रशिक्षणार्थी क्रिकेटपटूंमध्ये संवाद साधला जाणे महत्त्वाचे आहे. त्या संवादाची भाषा, समजून घेण्याची क्षमता अधिक महत्त्वाची आहे. तरच प्रशिक्षक आणि खेळाडूंमध्ये सुसंवाद साधला जाईल. मग परदेशी प्रशिक्षक हवा की देशातील प्रशिक्षक हवा असा वाद निर्माण करण्याची गरज राहणार नाही, असे प्रतिपादन भारताचा माजी कप्तान कपिलदेव याने केले.
सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना कपिलदेव बोलत होता. कपिलदेव यांच्याप्रमाणे या वेळी झालेल्या परिसंवादात देशी की परदेशी प्रशिक्षक याबाबत मत व्यक्त करताना ब्रेट ली व डिन जोन्स या दोन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी सांगितले, ‘खेळाडूंचा फिटनेस, त्याची देहबोली, तो ज्या देशात राहतो, तेथील संस्कृती आणि भाषा या गोष्टी नेहमीच निर्णायक ठरतात. खेळाडूला प्रशिक्षकाच्या सूचना, मार्गदर्शन व्यवस्थित समजणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तो ज्या समाजात मोठा झाला त्यांची संस्कृती, क्रीडासंस्कृती हीदेखील परदेशी प्रशिक्षकाने समजून घेणे महत्त्वाचे आहे.
सीएट क्रिकेट रेटिंगकडून (सीसीआर) गौरव
}कपिलदेव यांना सीएट इंटरनॅशनल लाइफटाइम अचीव्हमेंट अवॉर्ड देऊन गौरव
}इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ दि इयर-
कुमार संगकारा
}इंडियन क्रिकेटर ऑफ दि इयर- अजिंक्य रहाणे
}इंटरनॅशनल बॅट्समॅन ऑफ दि इयर-हशीम अमला
}इंटरनॅशनल बॉलर ऑफ दि इयर- रंगना हेराथ
}टी 20 प्लेअर ऑफ दि इयर- ड्वायने ब्राव्हो
}पॉप्युलर चॉइस अवॉर्ड- केरॉन पोलार्ड
}स्पेशल अवॉर्ड- रोहित शर्मा
}डोमेस्टिक क्रिकेटर ऑफ दि इयर-
आर विनय कुमार
}यंग प्लेअर ऑफ दि इयर- दीपक हुडा
कोण काय म्हणाले...
अजिंक्य रहाणे : सहकारी आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारला याचा मला अभिमान वाटतो.
रोहित शर्मा : डंकन फ्लेचर यांनी मला ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये कसे खेळावे याचा गुरुमंत्र दिला.
विनयकुमार : आयपीएलमध्ये अनुभव सर्व स्तरावरच्या क्रिकेटमध्ये कामी येतोय.
बातम्या आणखी आहेत...