आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणी म्हटले अहंकारी, कर कोणी दिला पाठिंबा; वाचा धोनीबाबतच्या प्रतिक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांगलादेशच्या विरोधात प्रथमच मालिका गमावल्यानंतर महेंद्रसिंग धोनी याला कर्णधारपदावरून हटवण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. सामना आणि मालिका गमावल्यानंतर धोनीनेही पत्रकार परिषदेत म्हटले होते की, त्याला हटवल्याने टीमची कामगिरी सुधारत असेल तर तो तयार आहे. अनेक क्रिकेट एक्सपर्ट्सनेही धोनीला कर्णधारपद सोडण्याचा सल्ला दिला आहे. बांगलादेशबरोबरच्या पराभवानंतर ट्विटरवरही ‘Please Retire Dhoni’ ट्रेंड करत आहे.

फॅन्स म्हणाले अहंकारी
ट्विटरवरील प्रतिक्रियांमध्ये अनेक गमतीशीर प्रतिक्रियाही होत्या. भारताचा पराभव आणि धोनीबाबतच्या प्रतिक्रियांनी आता योगराज सर्वात आनंदी असतील असे एखा जणाने म्हटले आहे. काही फॅन्सनी धोनीला हट्टी आणि अहंकारीही म्हटले. सलग फ्लॉप होऊनही रवींद्र जडेजाला टीममध्ये ठेवण्याच्या निर्णयावरून धोनीवर फॅन्स चांगलेच बरसले. 2015 चा विश्वचषक आणि त्याआधी जडेजा आऊट ऑफ फॉर्म होता. पण कर्णधार धोनीने त्याला टीममध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

संमिश्र प्रतिक्रिया
एकिकडे काही फॅन्स धोनीला प्रत्येक पराभवासाठी जबाबदार ठरवत होते तर काही फॅन्सनी धोनीला सपोर्टही केले. त्याच्या नजरेत धोनी टीम इंडियाचा सर्वोत्तम कर्णधार आहे आणि कायम राहील. एका फॅनने म्हटले की, धोनीने टीमला दोन वर्ल्ड कप (2011 वनडे आणि टी20) मध्ये विजय मिळवून देऊन चूक केली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, धोनीच्या निवृत्तीबाबत काय आहेत फॅन्सच्या कॉमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...