टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रोहित शर्मा याने मुंबईत तब्बल 30 कोटी रुपयांचा फ्लॅट विकत घेतला आहे. वरळी परिसरातील आहुजा टावर्स या बहुमजली इमारतीत 29 व्या मजल्यावर हा फ्लॅट आहे. सध्या रोहित बोरीवली येथील एका फ्लॅटवर राहतो. काही दिवसांनी रितिका सजदेह हिच्यासोबत तो या फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहे. हा आलिशान फ्लॅट बघा आतून.
- हा 4-बीएचके फ्लॅट सुमारे 5700 स्वेअर फूट आहे.
- लिव्हिंग रुमचा एरिया सुमारे 750 स्केअर फुट आहे. बाल्कनीच्या वॉलसाठी ग्लासचा वापर करण्यात आला आहे.
- बाल्कनीतून 270 डिग्रीचा व्हु मिळतो. येथून वांद्रे-वरळी सीलिंक दिसतो.
- मास्टर बेडरुम एखाद्या फाईव्हस्टार हॉटेलसारखे आहे. सुमारे 590 स्वेअर फुटमध्ये बेडरुम पसरले आहे. बेडरुममधून संपूर्ण सिटी व्हु मिळतो.
- मास्टर बाथरुममध्ये इम्पोर्टेड मार्बल लावण्यात आले आहे. येथे मार्बल आणि वुडवर्कचे कॉम्बिनेशन आहे.
- येथे दोन प्रकारचे किचन आहेत. वेट किचन आणि ड्राय किचन. दोन्ही पूर्ण फर्निश आहेत. हाऊस पार्टीसाठीही स्पेस आहे.
- डायनिंग एरिया किचनजवळ आहे. याला लिव्हिंगरुमपासून दूर ठेवण्यात आले आहे.
- सोसायटीत क्लब हाऊस आणि इंटरटेनमेंट एरिया आहे. योगा रुम, स्पा सेंटर, मिनी थिएटर आदी सुविधा आहेत.
- हाय-प्रोफाईल लोकांच्या गरजा लक्षात घेऊन बिझनेस एरियाही ठेवण्यात आला आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, रोहित शर्माच्या फ्लॅटचे डोळे दिपवणारे फोटो...