आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानचे माजी क्रिकेटर वसीम अक्रम यांच्या कारवर दुचाकीस्वारांचा गोळीबार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची- पाकिस्तानचे माजी क्रिकेटर आणि फास्ट बॉलर वसीम अक्रम यांच्या कारवर आज (मंगळवार) दुचाकीस्वारांनी गोळीबार केला. यात वसीम थोडक्यात बचावले. त्यांनी पाकिस्तानी मीडियाला सांगितले, की माझ्यावर गोळीबार करणारे दोघे दुचाकीवर आले होते. मी त्यांच्या बाईकचा क्रमांक लिहिला आहे. तो पोलिसांना दिला आहे. मला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. मी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी जात होते वसीम
कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी वसीम जात होते. पाकिस्तानच्या नवोदित फास्ट बॉलर्सना कोचिंग देण्यासाठी हा 13 दिवसांचा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. इंडियन प्रिमिअर लीगच्या कोलकता नाईटरायडर्सचे वसीम बॉलिंग कोच आहेत.
भारतीय युवकांना प्रशिक्षण देण्याचा झाला होता विरोध
आयपीएलच्या दरम्यान भारतीय नवोदित क्रिकेटर्सना बॉलिंगचे प्रशिक्षण देणे आणि त्यांचे कौतुक करणे याचा पाकिस्तानमध्ये विरोध झाला होता. त्यानंतर आपली बाजू मांडताना वसीम म्हणाले होते, की मी एक क्रिकेटर आहे. माझ्याकडे कोणताही खेळाडू टिप्स घ्यायला येईल तर त्याला शिकवणे हे माझे कर्तव्य आहे. मी पुढेही असे करीत राहिल.
भारतीय कोच होण्यावर होती असहमती
मला जर भारतीय कोच होण्याची संधी मिळाली तर हे माझे भाग्य असेल. पण मी भारतीय टीमचा कोच होऊ शकणार नाही. मी कोच झालो तर मला वर्षभर टीमसोबत राहावे लागेल. मला माझ्या कुटुंबाला वेळ द्यायचा आहे.
पुढील स्लाईडवर बघा, नवोदित बॉलर्सना प्रशिक्षण देताना वसीम अक्रम....
बातम्या आणखी आहेत...