आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय पेहरावातही देते विदेशी मल्लांना धोबीपछाड, WWE मध्ये पहिली भारतीय मल्ल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंतरराष्ट्रीय कुस्तीसाठी लागणारा पोशाख न घालताच भारतीय पोशाखात कुस्तीचे मैदान गाजवणारी कविता देवी सर्वांहून निराळी आहे. - Divya Marathi
आंतरराष्ट्रीय कुस्तीसाठी लागणारा पोशाख न घालताच भारतीय पोशाखात कुस्तीचे मैदान गाजवणारी कविता देवी सर्वांहून निराळी आहे.
दिल्ली -भारतीय रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांनी भारतीय पेहरावातच लढाईचे मैदान गाजवले. भारतीय महिला कुस्तीपटू कविता देवी सरवार सुटवर कुस्तींच्या रिंगमध्ये विदेशी मल्लांना आकाश दाखवते तेव्हा तिच्यातही रणरागिणी संचारल्याचा भास होतो. आंतरराष्ट्रीय कुस्तीसाठी लागणारा पोशाख न घालताच भारतीय पोशाखात कुस्तीचे मैदान गाजवणारी कविता देवी सर्वांहून निराळी आहे. 

शक्तितोलन (पाॅवर लिफ्टिंग) ते डब्ल्यूडब्ल्यूई कुस्तीपटू असा तिचा  रंजक प्रवास राहिला अाहे. जगभरात प्रसिद्धी मिळवणा रा धिप्पाड शरीराचा भारतीय पहिलवान खली हेच तिचे प्रेरणास्थान आहे. पदार्पणात तिची लढत न्यूझीलंडची मल्ल डकोटा काईविरुद्ध रंगली. कविताने असा काही त्वेषपूर्ण बहारदार खेळ केला की सामना बघणारे प्रेक्षक दंगच झाले. 

लढतीदरम्यान कविताने कितीतरी वेळा डकोटाला वर हवेत उचलून खाली आदळले. जणू ती एखादी बाहुलीच आहे. या लढतीसाठी कविताने नारंगी रंगाचा सलवार सुट आणि मर्दानी घालायच्या तसाच शेला कंबरेला गुंडाळला होता. पहिल्या फेरीत भारतीय कुस्तीपटूने डकोटाला असे काही धुतले की तीही थक्कच झाली. अनुभव नसल्यामुळे अखेर कविताला सुताच्या फरकाने पराभव सहन करावा लागला परंतु, भारतीय महिलांसाठी आता कोणतेही क्षेत्र अपवाद ठरणार नाही, हेच तिने तिच्या खेळातील बहादुरीने दाखवून दिले. 

या लढतीचा व्हिडिओ जगभरात चांगलाच व्हायरल झाला असून सध्या डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये कविताच्याच नावाची जोरदार चर्चा अाहे. तिच्यापासून प्रेरणा घेत काही अन्य भारतीय महिला कुस्तीपटूही डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये मैदान गाजवण्याची तयारी करीत आहेत. याद्वारे भारतालाही आलिम्पिकसाठी उत्तम महिला कुस्तीपटू मिळतील, अशी आशा बळावली आहे.

महाबली खलीची शिष्या
कुस्तीच्या डब्ल्यूडब्ल्यूई प्रकारात सहभागी झालेली कविता ही पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू असून येथेही तिने चांगलीच चमक दाखवली आहे. भारतीय पोशाखात ज्या पद्धतीने तिने खेळ केला ते बघून संपूर्ण जगतच चकित झाले. डब्ल्यूडब्ल्यूएफ कुस्तीच्या रिंगणातील महाबली खलीची ती शिष्या आहे. तिला भविष्यात खलीप्रमाणेच डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये आपला दरारा निर्माण करायचा आहे.
बातम्या आणखी आहेत...