आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fish Chanakya Ll Predicts India\'s Win Against Australia At SCG, World Cup 2015

Video : पाच वेळा खरी ठरली आहे चाणक्य माशाची भविष्यवाणी, भारत जिंकणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अनेक क्रिकेट तज्ज्ञ आणि ज्योतिषांच्या भाकितानंतर आता चेन्नईच्या चाणक्य 2 नावाच्या माशानेशी ऑस्ट्रेलियाविरोधात दुसऱ्या सेमिफायनलमध्ये भारत सामना जिंकणार असल्याचे भविष्य वर्तवले आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या एक रंगतदार सामना होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या सामन्यात जिंकणारा संघ रविवारी न्यूझीलंडच्या विरोधात फायनल खेळणार आहे.
फोटो - भविष्य वर्तवणारा चाणक्य मासा.

एएनआय या वृत्तसंस्थेने सोशल मीडियावर ट्वीट केलेल्या एका व्हिडिओमध्ये चाणक्य 2 नावाच्या या माशाने दोन वेळा भारताच्या झेंड्याकडे निर्देश केल्याचे दिसते. हा मासा अॅक्वेरियममध्ये ठेवण्यात आला आहे. त्यात दोन्ही देशांचे झेंडे लावण्यात आले. प्रत्येक झेंड्याखाली असलेल्या बास्केटमध्ये माशाचे खाद्य असते. या माशाने 23 मार्च रोजी झालेल्या सामन्यातही साऊथ अाफ्रिकेच्या विरोधात न्यूझीलंड जिंकण्याची भविष्यवाणी केली होती. त्याशिवाय या माशाने चारही क्वार्टर फायनलमध्ये केलेली भविष्यवाणीही खरी ठरली होती. काही वर्षांपूर्वी फुटबॉल विश्वचषकातही पॉल ऑक्टोपसच्या भविष्यवाणीबाबत चांगलीच चर्चा झाली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, VIDEO